JOIN US
मराठी बातम्या / करिअर / BREAKING: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणार

BREAKING: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणार

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीनंतर महाराष्ट्रात शाळा उघडणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती.

जाहिरात

शाळांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री? कोविडनंतर रुग्ण खडखडीत बरे सुद्धा होत आहेत पण पण पोस्ट कोविड दुष्परिणाम सुद्धा दिसताहेत. आपण कशासाठी विषाची परीक्षा बघायची असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन सावधपणे पावले टाकत आहोत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 नोव्हेंबर : कोरोनामुळे शाळा बंद (Maharashtra School Reopen) ठेवण्यात आल्या होत्या. अनलॉकच्या (Maharashtra Unlock) वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हळूहळू अर्थव्यवस्था सुरू झाली मात्र शाळा आणि महाविद्यालंय बंदच होती. ऑनलाइन पद्धतीनं (Online Education) राज्यात शिक्षण दिलं जात आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्न आणि चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात शाऴा आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजूरी मिळणं बाकी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात एसओपी देखील तयार करण्यात आला आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शाळा सुरू होताच झाला कोरोनाचा विस्फोट! ‘या’ राज्यात 575 विद्यार्थी, 829 शिक्षक पॉझिटिव्ह एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे. यंदा नेहमीसारखी नसणार दिवाळी! फटाके, दिवाळी पहाट बाबतचे राज्य सरकारचे 5 नियम अंतिम वर्षांच्या रखडलेल्या परीक्षा देखील ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र आता दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत सरकार विचार करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या