JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra HSC result 2021 LIVE: घरून अभ्यास करतानाही बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी; इतके टक्के लागला निकाल

Maharashtra HSC result 2021 LIVE: घरून अभ्यास करतानाही बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी; इतके टक्के लागला निकाल

बारावीच्या निकालात (Maharashtra HSC result 2021) मुलींनीच बाजी मारली आहे

जाहिरात

मुंबईतील शाळा सुरू होणार?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 ऑस्ग्स्ट: बहुप्रतीक्षित महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2021) अखेर घोषित करण्यात आला आहे. News18लोकमत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result) वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. अंतर यंदाचा निकाल ऐतिहासिक आहे. परीक्षा न देताही बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (HSC results 2021) जाहीर करण्यात आला आहे. विशेष मूल्यांकन पद्धतीनं हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे.

दरवर्षीच्या निकालाप्रमाणेच यंदाही दहावी आणि बारावीच्या निकालात (Maharashtra HSC result 2021) मुलींनीच (Girls students HSC result ) बाजी मारली आहे. विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यास घरूनच करावा लागला होता. कोरोनामुळे पूर्व जुनिअर कॉलेज आणि शाळा बंद असल्यामुळे परीक्षाही होऊ शकली नाही. मात्र तरीही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. हे वाचा - Maharashtra HSC result 2021 LIVE: बारावीचा निकाल जाहीर; इथे पाहा आणि डाउनलोड करा यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 99.73 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 99.54 इतका आहे. म्हणजेच 0.19 टक्के नी मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल यंदा 99.63 टक्के लागला आहे. यंदा राज्यातील एकूण 13 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात करण्यात आली होती.  यंदा विज्ञान शाखेचा 99.55 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा 99.83 टक्के तर वाणिज्य  शाखेचा 99 .91 तयेक निकाल लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या