JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra SSC Result 2023 LIVE updates: उरले काही तास, दहावीचा निकाल कुठे पाहायचा?

Maharashtra SSC Result 2023 LIVE updates: उरले काही तास, दहावीचा निकाल कुठे पाहायचा?

जाहिरात

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. अखेर उद्या शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं होतं. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. अखेर उद्या शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता निकाल हा बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन जाहीर होईल.

June 1, 2023, 9:51 pm IST

निकाल मान्य करा

यंदा ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. म्हणूनच तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. जो निकाल लागले तो मान्य करा. अधिक मार्क्स मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका आणि कमी मार्क्स मिळाले म्हणून निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढे जा.
June 1, 2023, 9:51 pm IST

आपल्या पाल्यांवर ठेवा विश्वास

पाल्यांचा निकाल नक्की कसा लागेल याचं टेन्शन घेऊ नका. आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवा. त्यांनी अभ्यास चांगला केला असेल तर त्यांना चांगले मार्क्स नक्की मिळतील. त्यांनतर प्रवेशाची प्रक्रियाही उत्तम पद्धतीनं पार पडेल.
June 1, 2023, 9:44 pm IST

टेन्शनमुळे झोपेचं खोबरं करू नका

जसे जसे बोर्डाचे निकाल जवळ येऊ लागतात तसं पालकांचं टेन्शन वाढू लागतं. आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळतील का? चांगले मार्क्स मिळाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का? अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत तर काय होईल? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ पालकणांच्या डोक्यात सुरु असतो. पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही.
जाहिरात
June 1, 2023, 9:05 pm IST

कुठे घेणार प्रवेश?

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बेंगळुरू, नोएडा, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद असे महाराष्ट्राबाहेरचे पर्याय आहेत. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांनी या विषयातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या कोर्सची प्रवेश परीक्षा आणि प्रवेशासंबधीच्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर वर्षभरात 50 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. पण, विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र असेल तर तो खर्च सरकारकडून त्याला मिळतो. त्याचबरोबर राज्याच्या बाहेरच्या मोठ्या विद्यापीठातून हा कोर्स करायचा असेल तर त्याला वर्षभरात एक ते दीड लाख रूपयापर्यंतचा खर्च येऊ शकतो.
June 1, 2023, 8:50 pm IST

बारावीनंतर हटके करिअर करायचंय?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग हे दोन क्षेत्रांबद्दल सध्या बरीच चर्चा केली जाते. मशिनला डेटा सायन्सच्या माध्यमातून एक अल्गोरिदम सेट केला जातो. त्यानंतर आपल्याला कमांड देता येते. त्यानंतर मशिन त्या कमांडनुसार काम करते. रजनीकांत आणि ऐश्वर्या राय-बच्चन हिचा रोबोट हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. त्यामधील प्रत्येक गोष्ट ही रोबोटिक्सच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं शक्य असल्याचं दाखवलं आहे.
June 1, 2023, 8:40 pm IST

पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स आवश्यक आहेत?

स्टेट बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये किमान 35 टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षेतही विद्यार्थी उपस्थित आणि उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांना 35 टक्के मार्क्स मिळू शकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नाही.

अशा विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेला बसता येणार आहे.

तसंच विद्यार्थ्यांना कोणत्याही पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाले आहेत असं वाटत असेल तर असे विद्यार्थी पेपर्स रिचेकिंगलाही देऊ शकणार आहेत.

याबाबत संपूर्ण प्रोसेस बोर्डातर्फे कळवण्यात येणार आहे.

जाहिरात
June 1, 2023, 8:31 pm IST

गेल्या वर्षी काय होती परिस्थिती

गेल्या वर्षी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी संपूर्ण 16,38,964 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 8,89,505 विद्यार्थ्यांची संख्या होती तर 7,49,458 इतकी विद्यार्थिनींची संख्या होती.
June 1, 2023, 8:26 pm IST

15 लाख विद्यार्थ्यांचा निकाल काय?

यंदा राज्यात 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. यावर्षी 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा चालली होती
June 1, 2023, 8:20 pm IST

एका क्लिकवर बघता येईल निकाल

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 2023 News18.com वर पाहता येईल.

सुरुवातीला  https://lokmat.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/ ही लिंक ओपन करा.

यानंतर तुम्हाला बातमीच्या मध्ये एक बॉक्स दिसेल.

यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.

यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.

यानंतर तुम्हाला तुमचा क्लास म्हणजे दहावी की बारावी हे सिलेक्ट करायचं आहे.

यानंतर खाली देण्यात आलेल्या गणिताच्या कोड्याचं उत्तर द्यायचं आहे. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.

यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही करता येणार आहे.

जाहिरात
June 1, 2023, 8:19 pm IST

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी जाहीर होतो  अखेर उद्या शुक्रवार म्हणजेच 02 जून रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर (maharashtra ssc result 2023) होणार आहे
  • First Published :

फोटो

महत्वाच्या बातम्या