JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ISRO Recruitment 2021: इस्रोमध्ये ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी; आजच करा अर्ज

ISRO Recruitment 2021: इस्रोमध्ये ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी; आजच करा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी पूर्ण अर्ज भरून hqapprentice@isro.gov.in वर योग्य अर्जासह पीडीएफ स्वरुपात कागदपत्रांची एक फाईल ईमेल करावी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 जुलै: कोरोना महामारीमध्ये अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. बरेच तरुण नोकरीच्या शोधात आहेत. अशातच देशातील एका मोठ्या संशोधन संस्थेने ॲप्रेंटिसशिपची (Apprenticeship) संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (ISRO) ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. इस्रोने पदवीधर आणि टेक्निशियन ॲप्रेंटिसशिपसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची बंगळुरुच्या इस्रो मुख्यालयामध्ये नेमणूक केली जाईल. तरुणांसाठी इस्रो या प्रतिष्ठित संस्थेमध्ये ॲप्रेंटिसशिप करण्याची नामी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी इस्रोचे अधिकृत संकेतस्थळ वेबसाईट- isro.gov.in वर अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे. तरी अंतिम तारखेला किंवा अंतिम तारखेच्या (Last date to apply) पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. इंडियन एक्सप्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी पूर्ण अर्ज भरून hqapprentice@isro.gov.in वर योग्य अर्जासह पीडीएफ स्वरुपात कागदपत्रांची एक फाईल ईमेल करावी. कागदपत्रांमध्ये उमेदवारांनी त्यांचे SSC/ दहावीचे मार्कशीट (Marksheet) /सर्टिफिकेट (Certificate), PUC / बारावीचे मार्कशीट / सर्टिफिकेट, पदवी / डिप्लोमाचे सर्व सेमिस्टर / वर्षांचे सर्टिफिकेट, पदवी / डिप्लोमाचे सर्व सेमिस्टर / वर्षांची प्रोव्हिजनल मार्कशीट आणि NATS नावनोंदणी क्रमांक पाठविणे आवश्यक आहे. ईमेलचा सबजेक्ट “Application for above mentioned Apprenticeship Category” हा असावा. बंपर सरकारी नोकऱ्या, आठवी, दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी नोकरीच्या अनेक संधी, जाणून घ्या तपशील इस्रो अ‍ॅप्रेंटिसशिप 2021 - एकूण जागा: 43 अभियांत्रिकी पदवीधर (Engineering Degree): 13 अभियांत्रिकी डिप्लोमा: 10 कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा: 20 इस्रो अ‍ॅप्रेंटिसशिप 2021 पात्रता पदवीधर अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. ही पदवी परीक्षा उमेदवाराने प्रथम श्रेणी म्हणजेच किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेली असावी. टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त राज्य बोर्डामधून संबंधित विषयाचा अभियांत्रिकीचा डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उमेदवाराने प्रथम श्रेणी म्हणजेच किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेली असावी. तर कमर्शियल प्रॅक्टिस अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कमर्शियल प्रॅक्टिसचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उमेदवाराने प्रथम श्रेणी म्हणजेच किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेली असावी. निवड झालेल्या उमेदवारांना अ‍ॅप्रेंटिसशिपच्या प्रकारानुसार 8000 ते 9000 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळू शकते. सोबतच याठिकाणी मिळणारा अनुभव करियरच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणारा असेल. संपूर्ण निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहिती इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यशस्वीरित्या निवड होण्यासाठी अर्जाची प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या