नवी दिल्ली, 28 ऑगस्ट: भारतीय सैन्याच्या (Indian Army Recruitment) ASC सेंटरमध्ये (ASC Centre South Recruitment 2021) 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 400 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर (कामगार), MTS (सफाईवाला) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (Civilian Motor Driver) क्लिनर (सफाईकर्मी) (Cleaner) कुक (Cook) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर (Civilian Catering Instructor) लेबर (Labor) MTS (सफाईवाला) (MTS) शैक्षणिक पात्रता सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (Civilian Motor Driver) -10वी उत्तीर्ण आणि सर्व प्रकारच्या वाहनांचे लायसन्स आवश्यक. क्लिनर (सफाईकर्मी) (Cleaner) - 10वी उत्तीर्ण कुक (Cook) - 10वी उत्तीर्ण आणि भारतीय खाद्यपदार्थ बनवता येणं आवश्यक. तसंच एक वर्षाचा अनुभव आवश्यक. सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर (Civilian Catering Instructor) - 10वी उत्तीर्ण आणि कॅटरिंगमध्ये डिप्लोमा. लेबर (Labor) - 10वी उत्तीर्ण MTS (सफाईवाला) (MTS) - 10वी उत्तीर्ण हे वाचा - Sports Authority Of India Recruitment: ‘या’ पदासाठीच्या तब्बल 220 जागांसाठी भरती या पत्त्यांवर पाठवा अर्ज पीठासीन अधिकारी, सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, ASC सेंटर (दक्षिण)-2 ATC, Agram Post, Bangalore-07 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.