JOIN US
मराठी बातम्या / करिअर / IIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक

IIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक

Sarkari Naukri updates: आयआयटी रुरकीमध्ये शिक्षकेतकर कर्मचाऱ्यांची भरती होत आहे. यामध्ये लॅब असिस्टंटपासून ते फार्मासिस्ट अशा अनेक पदांचा समावेश आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 एप्रिल: नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, आयआयटी रुरकी **(IIT Roorkee)**मध्ये ग्रुप ए (Group A), ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पदांसाठी भरती (Group B and C recruitment) प्रक्रिया होत आहे. एकूण 139 पदांसाठी ही भरती होत आहे. यामध्ये फायनान्स ऑफिसर, जीडीएमओ, हिंदी ऑफिसर, असिस्टंट स्पोर्ट्स ऑफिसर, सिनिअर सायंटिस्ट ऑफिसर (कंत्राटी), ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडेन्ट, असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, कोच, ज्युनिअर सुप्रिटेंडेन्ट, फार्मासिस्ट, ज्युनिअर असिस्टंट, ड्रायव्हर ग्रेड II या सारख्या पदांचा समावेश आहे. अर्ज भरण्याची सुरुवात 12 एप्रिल पासून सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2021 अशी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार https://www.iitr.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत असून प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता ही वेगवेगळी आहे. ग्रुप ए च्या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट, सीए, एमबीबीएस आणि पीएचडी आवश्यक आहे. तर ग्रुप बी साठी पोस्ट ग्रॅज्युएट, पदवी, आणि 12वी पास असणं आवश्यक आहे. पाहूयात पद आणि रिक्त पदांची संख्या ग्रुप A फायनान्स ऑफिसर (Finance Officer) - 1 जीडीएमओ (General Duty Medical Officer) - 2 हिंदी ऑफिसर (Hindi Officer) - 1 असिस्टंट स्पोर्ट्स ऑफिसर (Assistant Sports Officer) - 1 सिनिअर सायंटिस्ट ऑफिसर (कंत्राटी) - 1 वाचा:  Maharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार ग्रुप B, C ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडेन्ट - 1 असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर - 1 कोच - 6 ज्युनिअर सुप्रिटेंडेन्ट - 31 फार्मासिस्ट - 1 ज्युनिअर असिस्टंट - 52 ज्युनिअर असिस्टंट - 39 ड्रायव्हर ग्रेड II - 1 वेतन - ग्रुप एच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे लेवल 10, पे लेवल 12 आणि 14 लेवलच्या श्रेणीनुसार पगार मिळेल. तर ग्रुप बीच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे लेवल 6 (35,400 - 1,12,400)वेतन मिळेल. ग्रुप सीच्या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पे लेवल 5 नुसार (29200-92300) पे लेवल - 3 (21,700-69,100) वेतन मिळेल. ग्रुप ए पदाच्या भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी iitr.ac या लिंकवर क्लिक करा. ग्रुप बी आणि सी पदाच्या भरतीसाठीची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी iitr.ac या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या