JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Breaking: राज्यातील शाळा आणि कॉलेजेस कधी सुरु होणार? यावर उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान;म्हणाले...

Breaking: राज्यातील शाळा आणि कॉलेजेस कधी सुरु होणार? यावर उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान;म्हणाले...

यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy CM Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 सप्टेंबर: संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्यात (schools and colleges reopening in Maharashtra) यावी असा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday samant) यांनी राज्यातील महाविद्यालयं (Collges opening date in Maharashtra) येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सांगितला होता. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्यांची कोरोनाची कोरोनाची स्थिती बघूनच शाळा (School opening date in Maharashtra) सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy CM Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्र्यांच्या (CMO Maharashtra) आदेशानं घेण्यात येऊ शकतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णय महत्त्वाचा असणार आहे. राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव किती आहे यावर शाळा आणि कॉलेजेस कधी सुरु होणार हे अवलंबून राहणार आहे. हे वाचा - Pune Metro Recruitment: पुणे मेट्रो रेल्वेमध्ये तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती; अडीच लाखांवर मिळणार पगार राज्यात आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपलं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं असं आवाहनही अजित पवारांकडून करण्यात आलं आहे. लहान मुलांसाठी लस कधी? लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने लसीला परवानगी दिल्यानंतर शालेय मुलांना लस देण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने करण्यात येईल. जेणेकरून दिवाळीनंतर शाळा सुरू करणे सोयीचे होईल, अशी मानसिकता सरकारने ठेवली असल्याचंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. हे वाचा - TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही

शाळाही सुरु होणार काही दिवसांआधी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही शाळा सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र आता सणांच्यानंतर कोरोणचा प्रादुर्भाव बघूनच राज्यातील शाळा सुरु करण्यात येईल असं संगणयत आलं आहे. तसंच राज्यातील कॉलेजेसमध्ये नवीन शैक्षणिक वर्षही 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात येणार आहे.

मुंबईत कधी सुरु होणार शाळा? मुंबईत शाळा सुरु करण्याचा निर्णय येत्या दिवाळीनंतरच घेण्यात येईल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. अर्थातच राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतरच शाळा कधी सुरु करण्यात येईल हे ठरवलं जाणार आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच शाळा सुरु कारंब्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या