Representative Image
पुणे, 28ऑगस्ट : पुणे विभागातील 11 वी प्रवेशाची (11th Admission Pune) पहिली कटऑफ लिस्ट (11th Admission cut off list) अखेर जाहिर झालीय. दहावीच्या टक्केवारीवर आधारीत या पहिल्या प्रवेश यादीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी टॉप 5 कॉलेजमधील (Top 5 colleges in Pune for 11th) कलाशाखेची कटऑफ लिस्ट (Cut off list of Arts) ही चक्क सायन्सपेक्षा (Science cut off list) जास्त टक्केवारीला क्लोज झालीय. पुण्यातील ख्यातनाम फर्ग्युसन कॉलेजमध्ये (Fergusson college Pune) तर सलग दुसऱ्या वर्षी हा चमत्कार पाहायला मिळालाय. याचाच सरळ अर्थ असा निघतो की मेरिट लिस्टमधील स्कॉलर मुलांचा ओढा आता सायन्स पेक्षा आर्ट्सकडे जास्त दिसून येतोय. फर्ग्युसन कॉलेजची आर्ट्सची पहिली कटऑफ 97 टक्के तर सायन्सची 96.4 टक्क्यांवर क्लोज झालीय गेल्यावर्षी तर फर्ग्युसनची आर्ट्सची पहिली कटऑफ लिस्ट चक्क सायन्सपेक्षा अधिक होती. सिव्हिल सर्विसमध्ये करिअर करायचे असल्याने मिरीटमधील मुलांचा कल सायन्सऐवजी आर्ट्स कडे वाढत असल्याचं निरिक्षण प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी नोंदवलंय. तसंच यावर्षी दहावीत 500/500 म्हणजेच 100 टक्के गुण मिळवलेल्या एनटी-डी प्रवर्गातील मुलीने देखील फर्ग्युसन कॉलेजमधील अकरावी आर्ट्सलाच प्रवेश घेण्यास पसंती दिल्याची माहिती सहायक शिक्षण संचालिका मीना शेंडकर यांनी दिलीय. आताची पिढी ही सिव्हील सर्विसमधील करीअरच्या बाबतीत जरा अधिकच फोकस असल्याचं स्पष्ट होतंय. कारण यापूर्वी मेरिटमध्ये आलेली मुलं जास्त करून सायन्स शाखेला जाऊन आधी डॉक्टर, इंजीनियर असा प्लँन बी पक्का करून मगच सिव्हील सर्विसकडे आर्कषित व्हायची, आता माञ, ते चिञ बदलताना दिसतंय. हे वाचा - Sports Authority Of India Recruitment: ‘या’ पदासाठीच्या तब्बल 220 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय
सायन्सऐवजी आर्टस शाखेत प्रवेश घेतला तर अवांतर वाचनाला वेळ मिळतो आणि त्याचा फायदा सिव्हील सर्विस एक्झाममध्ये होतो म्हणूनच कदाचित आजकालची स्कॉलर मुलं ही जाणिवपूर्वक अकरावीपासीनूच सायन्सऐवजी ऐवजी कलाशाखेत प्रवेश घेत असावीत, असं निरिक्षण जाणकार नोंदवतात
दरम्यान, बीएमसीसी कॉलेजची कॉमर्सची पहिली कटऑफ (Commerce Cut Off List) 95.2 टक्क्यांना क्लोज झालीय तर sp कॉलेज arts ची पहिली कटऑफ 93.4% ला सायन्सची 92.8%ला क्लोज झालीय इतर नामांकित कॉलेजमध्येही 90 टक्क्यांच्याच पुढे पहिली यादी क्लोज झालीय. विशेष म्हणजे सिम्बायसिस वगळता फर्ग्युसनसह इतर बहुतांश नामांकित कॉलेजेसनी आपला मँनेजमेंट शिक्षण विभागाकडे सरेंडर केलाय त्यामुळे लाखोंची डोनेशन भरून टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बड्या बापांच्या मुलांची काहिशी अडचण झालीय. दरम्यान, पहिल्या फेरीत 38हजार 856 मुलांचे 11वीचे प्रवेश निश्चित झाले असून उर्वरित तीन फेऱ्यांमधून सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच मेरीटनुसार अकरावीचे प्रवेश मिळतील, अशी माहिती शिक्षण विभागाच्या सहायक संचालक मीना शेंडकर यांनी दिलीय. साधारण महिन्याभरात 11वीची प्रवेश प्रक्रिया पार पडेल पण टॉप 5 कालेजमधील 90 टक्के प्रवेश पहिल्याच यादीत फुल्ल झालेत… त्यामुळे इच्छुकांना आता इतर कॉलेजेसचा पर्याय निवडावा लागणार आहे