मुंबई, 01 सप्टेंबर : तुम्हाला रेल्वेत नोकरी हवी असेल तर उत्तम संधी आहे. मध्य रेल्वेनं व्हेकन्सी काढलीय. ही व्हेकन्सी शिक्षक पदासाठी आहे. ही पदं आहेत PGT, TGT आणि PRT. या पदांसाठी तुम्ही थेट इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता. एकूण 15 जागा आहेत. पद आणि पद संख्या PGT - 5 TGT (सायन्स) - 1 PRT ( आर्ट्स ) - 5 PRT - 4 नौदलात ‘या’ पदांसाठी व्हेकन्सी, पगार आहे 69,000 रुपयापर्यंत शैक्षणिक पात्रता PGT - पदव्युत्तर, M.Sc. किंवा 50 % गुणांसहित मास्टर डिगरी, बीएड TGT - पदवीधर, बीएड PRT - 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, पदवीधर, B.A., B.Sc. डिप्लोमा सरकारी नोकरीत ग्रॅज्युएट्स आणि 12वी पासना संधी, 182 जागांवर भरती वयाची अट 18 ते 65 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीचं ठिकाण भुसावळ आहे. अर्जाची फी नाही. 14 सप्टेंबर 2019ला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलाखत घेतली जाईल. मुलाखत मध्य रेल्वेच्या भुसावळच्या ऑफिसमध्ये होईल. अधिक माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ इथे क्लिक करा. BRO मध्ये नोकरीची मोठी संधी, 337 जागांवर होणार भरती याशिवाय तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. बाॅर्डर रोड्स ऑर्गनायझेशननं अनेक पदांवर व्हेकन्सी काढलीय. ड्राफ्टसमॅन, हिंदी टायपिस्ट, सुपरवायझर स्टोअर आणि रेडिओ मेकॅनिकसह अनेक पदांवर भरती केली जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी www.bro.gov.in वर अर्ज करावा. एकूण 337 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. या पदांसाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. 20 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. उमेदवाराला सर्व अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन शैक्षणिक योग्यता, वयाची मर्यादा, शेवटची तारीख आणि इतर अपडेट्स तपासून पाहा. मगच अर्ज करा. Ganesh Chaturthi 2019: मुंबईच्या राजासाठी खास राम मंदिराचा देखावा, पाहा VIDEO