प्रातिनिधिक फोटो
मुंबई, 15 फेब्रुवारी: कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams of 10th and 12th) विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच (Board Exams of Maharashtra state Board) होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. शाळा तिथे केंद्र (centers for 10th and 12th students) अशी सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नोकरीची सुवर्णसंधी! MPSC कडून ‘या’ अधिकारी पदांच्या 224 जागांसाठी भरतीची घोषणा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरूवातीस ऑनलाईन पद्धतीने व ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले. आता प्रचलित पद्धतीने राज्य मंडळाच्या परीक्षा होत असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात देखील झाली आहे. विद्यार्थ्यांना मिळणार अधिक वेळ विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्त परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. बँक PO की Clerk? बँकेत नोकरी करण्यासाठी कोणती पोस्ट सर्वोत्तम? जाणून घ्या प्रॅक्टिकल्सचं असेल असं नियोजन इयत्ता बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे. तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व तत्सम मूल्यमापनात मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्यात येत आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परीक्षेच्या प्रात्यक्षिक/ तोंडी/ अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व व परीक्षोत्तर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांबाबत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ परीक्षा केंद्र/ परिरक्षक व संबंधित घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.