JOIN US
मराठी बातम्या / करिअर / C-DAC Recruitment 2021: प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी मोठी भरती, पगार 55 ते 75 हजार

C-DAC Recruitment 2021: प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी मोठी भरती, पगार 55 ते 75 हजार

सी-डॅकही सॉफटवेअर आणि इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील देशातील एक नामांकित निमसरकारी कंपनी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 मे: सध्याच्या कोरोना साथीच्या (Corona Pandemic) काळात अनेकांच्या नोकऱ्या (Job) गेल्या आहेत, तर शिक्षण पूर्ण झालेली अनेक तरुण मुले-मुली चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. कम्प्युटर सायन्स, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी अशा क्षेत्रात सध्या भरतीचे प्रमाण कमी असले तरीसेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कंप्यूटिंग अर्थात सी-डॅकच्या (C-Dac) निमित्तानं. या क्षेत्रात नोकरी (Jobs) शोधणाऱ्या तरुणाईसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नोएडामधील सी-डॅकमध्ये 122 जागांवर भरती करण्यात येणार असून यासाठी पगारही भरभक्कम आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 55 ते 75 हजार रुपये पगार मिळणार आहे. सध्याच्या काळात अशी नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानं अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सी-डॅकही सॉफटवेअर आणि इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील देशातील एक नामांकित निमसरकारी कंपनी असून, चाळीस वर्षांपूर्वी स्वदेशी बनावटीचा पहिला महासंगणक परम याच संस्थेनं निर्माण केला होता. अनेक महत्त्वपूर्ण संशोधन या संस्थेत झालं आहे. देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीत सी-डॅकचा मोलाचा वाटा आहे. अशा संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कंप्यूटिंग म्हणजेच सी-डॅकनं प्रोजेक्ट इंजीनिअरच्या (Project Engineer) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीअसून, एकूण 122 पदांवर भरती होणार आहे. या पदावर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 56 हजार 475 रुपये ते 74 हजार 300 रुपये पगार मिळणार आहे. SBI Recruitment 2021: SBI मध्ये 5237 जागांसाठी बंपर भरती; पाहा कसा कराल अर्ज यासाठी ऑनलाइन अर्जकरायचे असूनअर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2021 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना नीट वाचणे आवश्यक आहे. अर्जाची शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर यासाठीची लिंक वेबसाइटवरून काढून टाकण्यात येणार आहे. मात्र नोएडा कराराचा कालावधी वाढविण्याचा किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार सी-डॅककडे आहे. कोणत्याही कारणा शिवाय 30 दिवसांची नोटीस देऊन करार रद्द केला जाऊ शकतो. या पदासाठी****अर्ज कसा करावा -अर्ज करण्यासाठी प्रथम सी-डॅकच्या  cdac.in  या वेबसाइटवर जा. -अर्ज भरण्यापूर्वी नियमआणि अटी काळजीपूर्वक वाचा. -नंतर व्हेकन्सी नोटीस समोर असलेल्या अप्लाय बटणवर क्लिक करा. -अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा. -सबमिट बटण दाबा -आपला पासपोर्ट साइजचा फोटो अपलोड करा. -आता एकयुनिक अ‍ॅप्लिकेशन क्रमांक तयार केला जाईल, तो लक्षात ठेवा. -भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट घेऊन ती सी-डॅककडे पुढील पत्त्यावर-एचआर, सी-डॅक, संशोधन भवन, सी -56 / 1, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर62, नोएडा -201309 (उत्तर प्रदेश) पाठवा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या