मुंबई, 22 फेब्रुवारी: आजकालच्या काळात नोकरी मिळणं (How to get a Job) सोपी राहिलेलं नाही. प्रचंड मेहनत, अभ्यास आणि परिश्रम करून जॉबची मुलाखत क्रॅक (Job Interview Cracking Tips) करून नोकरी मिळते. काही उमेदवारांना तर वर्षानुवर्षे वाट बघावी लागते तेव्हा नोकरी (Job Tips) मिळते. मग इतक्या मेहनतीनंतर मिळालेल्या नोकरीची आनंदच काही वेगळा असतो. नोकरी मिळाली म्हणून सर्वजण आनंदी असतात. मात्र जशी जशी नोकरी जॉईन (New job Joining Tips) करण्याचा दिवस जवळ येत असतो तसं उमेदवाराचं टेन्शन वाढत असतं. जॉबच्या पहिल्या दिवशी (First day at workplace tips) नक्की कसं वागावं, कसं बोलावं, कोणाशी बोलावं, काय करावं या सर्व प्रश्नांचा भडीमार उमेदवारांच्या मनावर होत असतो. म्हणून प्रचंड ताण (How to handle stress on first day at Job) येतो. तुम्ही अशा काही टेन्शनमधून गेला असाल आणि जात असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला असा काही टिप्स (How to behave on first day of new job) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही जॉबच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये (Office Tips) बिनधास्त आणि टेन्शन फ्री (How to be Tension free on first day of new job) राहू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. सर्वांशी नम्रपणे बोला तुमच्या नवीन नोकरीच्या पहिल्या दिवशी तुम्ही सर्वांशी नम्रपणे वागले पाहिजे आणि प्रोफेशनल बोलले पाहिजे. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही बोलू नका. तुमच्या भूतकाळाबद्दल तुमच्याशी बोलण्यात कोणाला आवड असल्यास, वैयक्तिक कथांऐवजी तुमचे प्रोफेशनल अनुभव त्यांना सांगा. घाबरू नका. नवीन नोकरीच्या पहिल्याच दिवशी जर कोणी तुम्हाला डिमोटिव्हेट करत असेल, तर ठामपणे आणि नम्रपणे सांगा की नवीन नोकरीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला निराश करण्यापेक्षा त्यांनी प्रोत्साहन दिल्यास तुम्हाला आनंद होईल. अशाप्रकारे नम्र राहा आणि सर्वांची मनं जिंकून घ्या. जगभरात Foreign Language शिकण्याचा का सुरु आहे ट्रेंड? जाणून घ्या याचे फायदे कमी बोला आणि निरीक्षण करा अनेकदा ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांना अति बोलण्याची सवय असते. असे कर्मचारी तुम्हाला तुमच्याबद्दल विचारू शकतात किंवा गरजेच्या नसलेल्या विषयावर चर्चा करू शकतात. मात्र असे करू नका. जॉबच्या पहिल्या दिवशी अतिशय कमी बोला आणि गरज असल्यास योग्य ठिकाणी उत्तर द्या. तुम्ही जॉईन केलेल्या कंपनीत नक्की काम कसे चालते किंवा तुमच्या प्रोफाईलला कसे काम करावे लागते याबाबत माहिती घ्या. फक्त अधिक ऐका, अधिक स्मित करा, अधिक होकार द्या आणि आजूबाजूच्या प्रत्येकाचे निरीक्षण करा. ते कसे बोलतात, काय बोलतात, ते कसे हसतात आणि इतर लोकांना कसा प्रतिसाद देतात ते पहा. Success Tips: तरुणांनो, ‘या’ वाईट सवयी एका क्षणात संपवू शकतात तुमचं career; आताच सोडण्याचा करा निर्धार तुम्हाला मदत करणारे सहकारी शोधा तुमच्या नवीन नोकरीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकजण तुम्हाला मदत करेल असे नाही. पण काही जण नक्की करतील. अशा लोकांसोबत निरीक्षण केले तर तुम्हाला संस्था अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत येईल. अशा सहकाऱ्यांना तुम्ही प्रश्नही विचारू शकता. पण कोणतेही मूर्ख प्रश्न विचारू नका. काहीही विचारण्यापूर्वी विचार करा. तुम्ही कामाशी संबंधित काहीही विचारू शकता मात्र इतर गोष्टींबद्दल विचारू नका.