JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी; वाचा संपूर्ण List

Career Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी; वाचा संपूर्ण List

असे अनेक कोर्सेस आहेत जे पूर्ण करून चांगल्या पगाराची (Salary in medical field) नोकरी मिळू शकते.

जाहिरात

करिअर ऑप्शन्स

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 डिसेंबर: कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्राशी (Career in Medical Field) निगडित असणाऱ्या सर्व कोरोना योद्धयांना दिवस रात्र मेहनत करताना आणि रुग्णांचे प्राण वाचवताना आपण सर्वांनीच बघितलं आहे. या कोरोना योद्धयांचा (Corona Worriers) वेळोवेळी सन्मानही करण्यात आला आहे. म्हणूनच आता मेडिकल फिल्डला (Career in Medical Field) प्रचंड मागणी वाढली आहे. कोरोनामुळे मॅनपॉवरही प्रचंड प्रमाणात लागते आहे. त्यामुळेच मेडिकल क्षेत्रात जॉब्स वाढले आहेत. फक्त डॉक्टरच नाही तर या क्षेत्रात असे अनेक कोर्सेस आहेत जे पूर्ण करून चांगल्या पगाराची (Salary in medical field) नोकरी मिळू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही कोर्सेस सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. बॅचलर ऑफ मेडिसिन:आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS)    12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान इच्छुकांमध्ये हा सर्वात पसंतीचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी 5.5 वर्षे आहे. अभ्यासक्रमाची एकूण किंमत सुमारे 6 लाख ते 53 लाख आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश बहुतेक संस्थांमध्ये NEET UG प्रवेश परीक्षेद्वारे केला जातो. बॅचलर ऑफ डेंटल सर्जन (BDS) जर तुम्हाला ऑर्थोडॉन्टिस्ट किंवा प्रोस्टोडोन्टिस्ट म्हणून करिअर करायचे असेल तर ते हा कोर्स करतात. ज्यांना डेंटिस्ट किंवा डेंटल सर्जन व्हायचे आहे त्यांच्यासाठी बीडीएस हा पायाभरणी कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी 4.5 वर्षे असून कोर्सची फी सुमारे 5 लाख ते 20 लाख रुपये आहे Career Tips: तुम्हालाही लाखो रुपये पगाराचा जॉब हवाय? मग निवडा हे करिअर ऑप्शन्स बॅचलर ऑफ होमिओपॅथिक आणि मेडिसिन सर्जरी (BHMS) होमिओपॅथिक औषध भारतात खूप लोकप्रिय असल्याने, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी BHMS कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधीही साडेपाच वर्षांचा असून अभ्यासाचा एकूण खर्च 4 लाख ते 10 लाखांपर्यंत आहे. बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS) या कोर्समध्ये ग्रीक संस्कृतीतून उद्भवलेल्या आणि आशियाच्या दक्षिण भागात लोकप्रिय असलेल्या युनानी औषध पद्धतीबद्दल शिकवणारे विषय समाविष्ट आहेत. या अभ्यासक्रमाच्या पदवीधरांना हकीम म्हणतात. अभ्यासक्रम कालावधी: 5.5 वर्षे. कोर्स फी 20,000 ते 2 लाख रुपये आहे. बॅचलर ऑफ फार्मसी (D.Pharm) ज्या विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल क्षेत्रात काम करायचे आहे किंवा स्वतःची फार्मसी सुरू करायची आहे, त्यांनी लोकांना बरे करण्यासाठी वापरलेली वेगवेगळी रसायने, औषधी क्षार आणि द्रावण समजून घेणे आवश्यक आहे. फार्मसी कोर्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी: 4.5 वर्षे. कोर्स फी आणि 5 ते 12 लाख इतकी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या