JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / करिअर / अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीतल्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक, लष्कराने केला असा सन्मान

अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीतल्या पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक, लष्कराने केला असा सन्मान

Army Aviation Corps : गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदा 2 महिला लष्करी अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. या दोघींना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं.

0106

26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा बराक यांची लष्करात कॉम्बॅट एव्हिएटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. लष्कराने बुधवारी त्यांचा गौरव केला. प्रशिक्षणानंतर त्यांचा या दलात समावेश करण्यात आला आहे.

जाहिरात
0206

अभिलाषा बराक यांना 36 आर्मी पायलटसह महासंचालक आणि कर्नल कमांडंट आर्मी एव्हिएशन यांनी प्रतिष्ठित विंग्सने सन्मानित केलं.

जाहिरात
0306

या प्रसंगी लष्करानं ट्विट केलं की, तरुण विमानचालक आता कॉम्बॅट एव्हिएशन स्क्वाड्रनमध्ये आपले पंख पसरवत आहेत.

जाहिरात
0406

गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांची हेलिकॉप्टर पायलट प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. या दोघांना नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं. लष्कराच्या म्हणण्यानुसार, 15 महिला अधिकाऱ्यांनी आर्मी एव्हिएशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जाहिरात
0506

सध्या विमान वाहतूक विभागात महिलांना हवाई वाहतूक नियंत्रण आणि ग्राउंड ड्युटीची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता अभिलाषा पायलटची जबाबदारी स्वीकारणार आहे. 2018 मध्ये, हवाई दलाच्या फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला ठरल्या होत्या.

जाहिरात
0606

आर्मी एव्हिएशन कोरची स्थापना 1 नोव्हेंबर 1986 रोजी एक ग्रुप म्हणून करण्यात आली. एएसी आता सैन्याच्या सर्व शस्त्रांसह आपल्या अधिकारी आणि सैनिकांना आकर्षित करते. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सच्या उमेदवारांना नाशिकमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CATS)येथे प्रशिक्षण दिलं जातं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या