JOIN US
मराठी बातम्या / करिअर / IT Jobs: 'या' दिग्गज IT कंपनीत इंजिनिअर्ससाठी बंपर Vacancy; जाणून घ्या पात्रतेविषयी संपूर्ण माहिती

IT Jobs: 'या' दिग्गज IT कंपनीत इंजिनिअर्ससाठी बंपर Vacancy; जाणून घ्या पात्रतेविषयी संपूर्ण माहिती

आज आम्ही तुम्हाला या पदभरतीबाबत माहिती देणार आहोत. पात्रतेपासून (Eligibility for Capgemini jobs) तर अपाय कारण्यापर्यंत सर्व माहिती जाणून घेऊया.

जाहिरात

capgemini jobs बद्दल जाणून घ्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जानेवारी:   जगभरातील दिग्गज IT कंपनी Capgemini नं भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये पदभरतीची (Capgemini Recruitment 2022) घोषणा केली आहे. कॅपजेमिनी ही सल्लागार, तंत्रज्ञान, आउटसोर्सिंग सेवा आणि स्थानिक व्यावसायिक सेवा प्रदान करणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे.  या कंपनीत जॉब (IT Jobs in India) करण्याची उमेदवारांना ही सुवर्णसंधी असणार आहे.  Capgemini नं इंजिनिअर्ससाठी (Capgemini Recruitment for Engineers) या भरतीची घोषणा केली आहे. आज आम्ही तुम्हाला या पदभरतीबाबत माहिती देणार आहोत. पात्रतेपासून (Eligibility for Capgemini jobs) तर अपाय कारण्यापर्यंत सर्व माहिती जाणून घेऊया. या पदांसाठी भरती     इंजिनिअर्स (Engineers) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इंजिनिअर्स (Engineers)  -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 2019 किंवा 2020 मध्ये पदवीधर झालं असणं आवश्यक आहे. MCA, BE/B.Tech, BE आणि B.Tech दोन्हीसाठी सर्व शाखांसाठी खुल्या आहेत. ME/M.Tech चे विद्यार्थी फक्त माहिती तंत्रज्ञान, माहिती विज्ञान, संगणक शास्त्रातून असले पाहिजेत. उमेदवारांना ME/M.Tech मध्ये 50% आणि त्याहून अधिक गुण मिळाले असणं आवश्यक आहे. शिक्षणादरम्यान उमेदवारांची एक वर्षांच्या वर गॅप नसणं आवश्यक आहे. दहावी, बारावी, पदवी आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन यादरम्यान कोणतीही गॅप नसावी. बारावीला दोनदा उपस्थित झालेला उमेदवार, दोन्ही मार्कशीट उपलब्ध असल्यास विचारात घेण्यात येईल. BE/B.Tech पूर्ण करण्यासाठी उमेदवाराला 4 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला असू नये. उमेदवारांनी कोणत्याही शहरामध्ये नोकरीसाठी तयार असणं आवश्यक आहे. परीक्षेत चांगले मार्क्स आले नाहीत म्हणून करिअर संपत नाही; असे कमवा लाखो रुपये अशी होणार उमेदवारांची निवड  उमेदवारांची निवड करण्यासाठी Technical Assessment Pseudo Code टेस्ट देणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर कम्युनिकेशन टेस्ट घेण्यात येणार आहे यामध्ये मल्टिपल चॉईस प्रश्नांच्या आधारे घेण्यात येणार आहे. यानंतर गेम बेस्ड aptitude टेस्ट घेण्यात येणार आहे. यानंतर उमेद्वारांकघी बेहेविअरल टेस्ट घेण्यात येणार आहे. यानंतर उमेदवारांचा HR Interview घेण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी 09 जानेवारी 2022 या तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.capgemini.com/in-en/careers/capgemini-exceller-off-campus-drive-for-2019-2020-graduates/  या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या