मुंबई, 21 जून : आजच्या कोरोनाच्या (Corona virus) काळात प्रत्येकालाच नोकरीची (Latest jobs) गरज आहे. मात्र सध्या आरोग्य क्षेत्रातील (Health sector jobs) उमेदवारांना नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध आहेत. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतही पदभरती (Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2021) होणार आहे. यास्ठीतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित अधीक्षक. या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार (Senior Medical Advisor) , सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer), प्रशिक्षित अधीक्षक (Trained Superintendent) या पदांकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2021 साठी एकूण 1850 – 2070 जागा रिक्त आहेत. हे वाचा - पत्रकारितेत करिअर करायचंय? कोर्सेसपासून कॉलेजपर्यंत इथे मिळेल संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – एमडी (MD) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस (MBBS), बीएएमएस (BAMS), बीएचएमएस (BHMS) प्रशिक्षित अधीक्षक – 12 वी पास आणि जीएनएम (GNM), नर्सिंग काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन इतका मिळेल पगार वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार - 1,50,000 - 2,00,000 रुपये प्रति महिना सहाय्यक वैद्यकीय अधिकारी - 50,000 - 80,000 रुपये प्रतिमहिना प्रशिक्षित अधीक्षक - 30,000 रुपये प्रतिमहिना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com या मेल आयईडी अर्ज पाठवा. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 असेल. नोकरीचं ठिकाण मुंबई राहील. इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज पाठवा आणि नोकरीचा लाभ घ्या. सविस्तर नोटिफिकेशन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.