JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / थंडीत तुमच्याप्रमाणंच Electric Car ही गारठते, बेस्ट परफॉर्मन्ससाठी घ्या 'ही' काळजी

थंडीत तुमच्याप्रमाणंच Electric Car ही गारठते, बेस्ट परफॉर्मन्ससाठी घ्या 'ही' काळजी

Electric Vehicles in Winter: हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होऊ लागतं तेव्हा काही वेळा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये काही समस्या येऊ लागतात. इलेक्ट्रिक वाहनात वापरल्या जाणार्‍या बॅटरीचं केमिकल कंपोजिशन किंवा रचना स्मार्टफोनच्या बॅटरीसारखीच असते.

जाहिरात

थंडीत तुमच्याप्रमाणंच Electric Car ही गारठते, बेस्ट परफॉर्मन्ससाठी घ्या 'ही' काळजी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर: अलीकडच्या काळात जगात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या खूप वेगानं वाढली आहे. हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होऊ लागते तेव्हा काहीवेळा इलेक्ट्रिक वाहनांमध्ये काही समस्या येऊ लागतात. इलेक्ट्रिक वाहनात वापरल्या जाणार्‍या बॅटरीचं केमिकल कंपोजिशन किंवा रचना स्मार्टफोनच्या बॅटरीसारखीच असते. त्यामुळेच ज्याप्रमाणे प्रचंड थंडीत मोबाईल चालवताना समस्या येतात, त्याचप्रमाणे ई-वाहनांच्या कार्यक्षमतेतही समस्या उद्भवू शकतात. पण जास्त चिंता करण्यासारखं काही नाही. जर तुम्ही थंडीच्या वातावरणात तुमच्या वाहनाच्या बॅटरीची योग्य काळजी घेतली तर कोणताही त्रास टाळता येईल. हिवाळ्यात तुमच्या ई-वाहनाची काळजी कशी घ्यावी ते आज आपण पाहणार आहोत. तुमचे ई-वाहन फास्ट चार्ज करू नका- हिवाळ्याच्या मोसमात बॅटरीला जलद चार्जिंगसाठी जास्त व्होल्टेज दिल्यास बॅटरीमध्ये अशा अनेक रासायनिक क्रिया घडतात, ज्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या हंगामात ईव्ही लवकर चार्ज करण्यासाठी जास्त व्होल्टेज न देण्याचा सल्ला दिला जातो. ई-वाहन हळूहळू चार्ज करा- हिवाळ्यात स्लो चार्जिंगमुळे निर्माण होणारा विद्युतप्रवाह बॅटरीला नुकसान पोहोचवत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी लेव्हल 1 चार्जिंग वापरण्याचा सल्ला दिला जातो. चार्जिंगसाठी लागेल जास्त वेळ- थंड हवामानात तुमच्या बॅटरीचे इलेक्ट्रोलाइट मंद होत असल्यानं चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही थंड हवामानात जास्त चार्जिंग कालावधीसाठी तयार असलं पाहिजे. हेही वाचा:  Bike Tips: किक मारून घामाघूम झाला तरीही बाईक स्टार्ट होत नाहीये? मग ‘या’ ट्रिक्सचा करा वापर बॅटरी डिस्चार्ज होऊ देऊ नका- वापरात नसतानाही तुमच्या वाहनाला डिस्चार्ज होऊ देऊ नका असं झाल्यास यामुळे तुमच्या बॅटरीला हानी पोहोचवणाऱ्या रासायनिक अभिक्रिया कमी होतील. गरम ठिकाणी वाहन पार्क करा- जर तुमच्याकडं गॅरेज असेल जेथे तुम्ही रात्री तुमची कार पार्क करू शकता, तर त्याचे तापमान 68 आणि 72 डिग्री फॅरेनहाइट दरम्यान राखण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्यानं तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीला हानी पोहोचवू शकणार्‍या अंतर्गत प्रतिक्रिया कमी होतील, ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता दीर्घकाळ चांगली राहील. रात्रीच्या वेळी वाहन मोकळ्या आकाशाखाली ठेवण्याऐवजी शक्य असल्यास झाकलेल्या गॅरेजमध्ये ठेवा.

इको मोड वापरा- हिवाळ्यात तुमचं ई-वाहन जास्त वेगानं चालवू नका. इको मोड हे असेच एक वैशिष्ट्य आहे, ज्या अंतर्गत तुमची बॅटरी पॉवर मर्यादित गतीपर्यंत वाचवली जाते. बाहेरचं हवामान थंड असताना इको मोड चालू करणं हा उत्तम पर्याय आहे. असं केल्यानं तुम्हाला चांगली रेंज मिळेल आणि तुमच्या बॅटरीचे आयुष्यही वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या