नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. कंपनी आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असते. सध्या कंपनी एक-दोन नव्हे तर 5 नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. ही फीचर्स अॅप तसंच व्हॉट्सअॅप वेबसाठी आहेत. व्हॉट्सअॅपच्या अपडेट्सची माहिती देणाऱ्या WaBetaInfo या वेबसाइटनुसार, कंपनी या नवीन फीचर्सचं टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप आपल्या मेसेजिंग अॅपमधील नाविन्य जपण्यासाठी कायम नवनवी फीचर्स युजरसाठी आणत असते. यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये नवनवीन अपडेट्स येत राहतात. दरम्यान, व्हॉट्सअॅप सध्या पाच नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. ही फीचर्स अॅप तसंच व्हॉट्सअॅप वेबसाठी आहेत. ही फीचर्स लवकरच युजर्सना वापरता येणार आहेत. ही पाच नवी फीचर्स कोणती आहेत, जाणून घेऊयात. 1. स्वतःशी चॅट करता येणार नवीन फीचर म्हणून कंपनी लवकरच युजर्ससाठी स्वतःशी चॅट करण्याची सुविधा देणार आहे. आता लवकरच व्हॉट्सअॅप चॅट ऑप्शनमध्ये ‘मेसेज युवरसेल्फ’चं अपडेट युजर्सना मिळू शकतं. हे चॅट तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये इतर कॉन्टॅक्ट्सप्रमाणेच असेल. यामध्ये तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी स्वतःलाच मेसेज करू शकता. 2. ग्रुप चॅटसाठी प्रोफाइल फोटो व्हॉट्सअॅपवर लवकरच ग्रुप चॅटमध्ये पर्सनल कॉन्टॅक्टसाठी प्रोफाइल फोटो सेट करण्याचं नवीन फीचर मिळणार आहे. ग्रुपमध्ये मेसेज येत असताना ग्रुपच्या कॉन्टॅक्टचा प्रोफाईल फोटोही दिसेल. एखाद्या कॉन्टॅक्टकडे प्रोफाइल फोटो नसल्यास किंवा त्यांच्या वैयक्तिक सेटिंग्जमुळे तो उपलब्ध नसल्यास, चॅटमध्ये डीफॉल्ट प्रोफाइल आयकॉन दिसेल. 3. कॅप्शनसह पाठवता येणार फोटो-व्हिडिओ येत्या काळात युजर्स कोणताही फोटो, व्हिडिओ आणि GIF पाठवताना कॅप्शन लिहू शकतील. सध्या हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.22.23.15 वर मिळतंय. ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे वाचा - रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष 4. फोटो ब्लर करण्याची सुविधा आता युजर्स कोणतीही माहिती पाठवताना फोटोदेखील ब्लर करू शकतील. हे फीचर बीटा टेस्टर्सवर उपलब्ध आहे. हे फीचर आणण्यामागचा उद्देश एखाद्याचा फोटो ब्लर करणं आणि त्याची ओळख लपवणं हा आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप यासाठी दोन ब्लर टूल्स आणणार आहे. जी युजर्सना फोटो ब्लर करण्यात मदत करतील. हे वाचा - ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी आता मोजावे लागणार हजारो रुपये! जाणून घ्या काय आहे 5. डेस्कटॉपवर मीडिया ऑटो डाउनलोड व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी विंडोज आणि Mac OS दोन्हीवर फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्ससाठी ऑटो-डाउनलोड सेटिंग्ज बंद करण्याची परवानगी देईल. सध्या, हे फीचर बीटा डेस्कटॉप युजर्ससाठी उपलब्ध आहे. येत्या काळात युजर्सना ही पाच नवीन फीचर्स अनुभवायला मिळणार आहेत.