JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Twitter वर आता ब्ल्यू नाही तर Gray Tick असेल ऑफिशियल अकाउंटची ओळख, अशाप्रकारे मिळवा

Twitter वर आता ब्ल्यू नाही तर Gray Tick असेल ऑफिशियल अकाउंटची ओळख, अशाप्रकारे मिळवा

अलीकडेच, कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाच्या संचालक एस्थर क्रॉफर्ड यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : ट्विटरचा ताबा घेतल्यापासून माध्यमांमध्ये रोज नवनवीन बातम्या पसरत आहेत. नवीन मालक एलोन मस्कने सर्वप्रथम सर्व वापरकर्त्यांना ब्लू टिक्स देण्याची घोषणा केली. यासाठी युजरला दर महिन्याला 8 डॉलर द्यावे लागतील. म्हणजेच सुमारे 650 रुपये भारतीय रुपयात भरावे लागतील. ट्विटर ब्लू टिकची सदस्यता सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 5 देशांमध्ये iOS वापरकर्त्यांसाठी सुरू झाली आहे. तर येत्या काही दिवसांत ही सेवा भारतासह काही देशांमध्ये सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत ट्विटरने अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि मीडिया हाऊसचे खाते वेगळे करण्यासाठी ‘ग्रे’ टिक देण्याची तयारी सुरू केली आहे. व्हेरिफाईड युजर्सची “ब्लू टिक” आता फक्त त्यांच्यासाठी उपलब्ध असेल जे 8 डॉलरचे मासिक शुल्क भरतात. प्लॅटफॉर्मची सध्याची पडताळणी प्रणाली 2009 पासून कार्यरत आहे आणि याची खात्री करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम वेरिफाइड रिक्वेस्ट तपासत असे. हेही वाचा -  ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना भारतीय रोजगार कायद्याचं संरक्षण मिळणार का? ग्रे टिक ऑफिशिअल अकाऊंटची ओळख - अलीकडेच, कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाच्या संचालक एस्थर क्रॉफर्ड यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये, ट्विटरच्या अधिकृत खात्यावर एक ग्रे टिक दिसत आहे. यासोबतच युजरच्या खात्याच्या खाली लिहिलेले अधिकृत खाते दिसत आहे. जरी यामध्ये ट्विटरचा नियमित निळा चेकमार्क देखील दिसत आहे. वापरकर्ते ग्रे टिक खरेदी करू शकणार नाहीत - एस्थर क्रॉफर्डने ((Esther Crawford) स्पष्ट केले की हे, अधिकृत ग्रे टिक सर्व पूर्व-वेरिफाईड खात्यांसाठी उपलब्ध होणार नाही आणि ही टिक खरेदीसाठी देखील उपलब्ध नाही. ही टिक सरकारी खाती, व्यावसायिक कंपन्या, व्यावसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना दिले जाईल. मस्कने नुकतेच अनेक देशांमध्ये ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन जारी केले आहे. ते अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी नाही. पण, मस्कने हे देखील स्पष्ट केले आहे की ते एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सर्व वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या