आंतरराष्ट्रीय कार सेफ्टी रेटिंग एजेन्सी ग्लोबल एनसीएपीने (NCAP) भारतीय ऑटोमोबाइल बाजारात सर्वात सुरक्षित कार्सची (Safe Cars) यादी अपडेट केली आहे.
NCAP ने #SaferCarsForIndia campaign अंतर्गत आतापर्यंत 50 कार्सची क्रॅश टेस्ट केली. या कार्सचं वेगवेगळ्या स्तरावर टेस्टिंग केलं जातं आणि अपघाताच्या शक्यतेवर क्रॅश केलं जातं.
Mahindra XUV700 - महिंद्राच्या फ्लॅगशिप एक्सयूवी 700 ला NCAP ने भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरवलं आहे. या कारचं टेस्टिंग मागील वर्षी करण्यात आलं होतं. या XUV कारला 7 एयरबॅग्स, 360 डिग्री व्यू कॅमेरा, ब्लाइंड व्यू मॉनिटरिंग आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टेंटसारखे फीचर्स आहेत. तसंच स्मार्ट पायलट असिस्टेंटसारखे आधुनिक फीचर्सही आहेत.
Tata Punch - टाटा Punch या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. टाटा पंचला अडल्टसाठी फाइव्ह स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तर चाइल्ड रेटिंगमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटाचीही तिसरी कार आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात सेफ्टीच्या दृष्टीने ओळख मिळाली आहे.
Mahindra XUV300 - महिंद्रा एक्सयूवी 300 महिंद्राची पहिली कार आहे, जिने NCAP टेस्ट पास केली. ही पहिली कार आहे, ज्याला सेफर चाइल्ड अवॉर्ड मिळाला आहे. या कारला अडल्टसाठी 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. तर चाइल्ड रेटिंगमध्ये 4 स्टार रेटिंग मिळालं आहे.
Tata Altroz - टाटा अल्ट्रोज एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. याला ग्लोबल NCAP वर क्रॅश टेस्टिंगदरम्यान अडल्टसाठी 5 स्टार रेटिंग मिळालं, तर लहान मुलांसाठी 3 स्टार रेटिंग देण्यात आलं. टाटा अल्ट्रोज प्रीमियम हॅचबॅक कार आहे.
Tata Nexon - सेफ्टीच्या दृष्टीने टॉप 5 मध्ये टाटाची ही तिसरी कार आहे. अडल्ट सेफ्टी रेटिंगमध्ये कारला 5 स्टार रेटिंग आहे. तर चाइल्ड सेफ्टीसाठी 3 रेटिंग मिळालं आहे. Nexon मध्ये ड्युअल फ्रंट एयरबॅग्स मिळतात.