JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Tata Motors Discount on Cars: गुडन्यूज! ‘या’ 5 सुपरहिट कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, होईल, किती मिळतीये सूट? वाचा डिटेल्स

Tata Motors Discount on Cars: गुडन्यूज! ‘या’ 5 सुपरहिट कारवर मिळतोय बंपर डिस्काउंट, होईल, किती मिळतीये सूट? वाचा डिटेल्स

Tata Motors Festival offer: टाटा मोटर्सनं सप्टेंबरसाठी त्यांच्या कारवर भरगोस सूट जाहीर केली आहे. कंपनीनं याला फेस्टिव्हल ऑफर्स असं नाव दिलं आहे.

जाहिरात

Tata लव्हर्सना लॉटरी! ‘या’ 5 कारवर मिळतोय तगडा डिस्काउंट , अजिबात सोडू नका सुवर्णसंधी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 सप्टेंबर: टाटा मोटर्सनं या महिन्यासाठी म्हणजेच सप्टेंबरसाठी त्यांच्या कारवर आकर्षक सूट जाहीर केली आहे. कंपनीनं याला फेस्टिव्हल ऑफर्स असं नाव दिलं आहे. कंपनी आपल्या 5 मॉडेल्सवर 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. ज्या मॉडेल्सवर सूट दिली जात आहे त्यात टाटा हॅरियर, टाटा सफारी, टाटा टियागो, टाटा टिगोर आणि टाटा नेक्सॉन यांचा समावेश आहे. हे फायदे रोख, एक्सचेंज, कॉर्पोरेट सूट अंतर्गत दिले जातील. ऑफर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत किंवा कार स्टॉकमध्ये असल्यास लागू राहतील. या सर्व कारवर मिळणाऱ्या सवलतींबद्दल एक-एक करून जाणून घेऊया. Tata Harrier आणि Safari वर 40,000 रुपयांपर्यंत सूट: टाटा त्यांच्या दोन सर्वात प्रीमियम एसयूव्ही (SUV) Harrier आणि Safari वर 40,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. कोणत्याही टाटा कारवर तुम्हाला मिळू शकणारी ही सर्वोच्च सूट आहे. कंपनी ही सूट एक्सचेंज बोनस म्हणून देत आहे. दोन्ही वाहनांवर समान ऑफर उपलब्ध आहे. हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.69 ते रु. 22.04 लाख रुपयांपर्यंत आहे, तर सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.34 ते 23.5 लाख रुपये आहे. Tata Tiago वर 23,000 रुपयांपर्यंत सूट: टाटा आपली लोकप्रिय हॅचबॅक टिआगोवर (Tiago) 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. टिआगोच्या XE आणि XT प्रकारांना 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. त्याच वेळी टिआगोच्या XZ Plus प्रकारावर 10,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. Tiago ची एक्स-शोरूम किंमत 5.39 ते 7.81 लाख रुपये आहे. ही करा एमटी आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये खरेदी केली जाऊ शकते. Tata Tigor वर 23,000 रुपयांपर्यंत सूट: टाटा आपल्या सेडान टिगोरवर 23,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. Tiago च्या XE आणि XM प्रकारांना 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. त्याच वेळी, Tigor च्या XZ आणि XZ+ प्रकारांवर 10,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. टिगोरची एक्स-शोरूम किंमत 5.99 ते 8.58 लाख रुपये आहे. ही कार एमटी आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशनमध्ये खरेदी केली जाऊ शकते. हेही वाचा:  कारमधून प्रवास करताना सीट बेल्ट नक्की लावा; अन्यथा ‘या’ कारणामुळे एअरबॅगही असूनही उपयोग होणार नाही Tata Nexon वर 20,000 रुपयांपर्यंत सूट:. टाटा या महिन्यात सर्वात जास्त विकली जाणारी SUV Nexon वर देखील सूट देत आहे. या SUV वर एकूण 20,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. डिझेल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे. त्याच वेळी, कंपनी आपल्या पेट्रोल व्हेरिएंटवर 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. नेक्सॉनने ऑगस्टमध्ये मागणीच्या बाबतीत ह्युंदाई क्रेटालाही मागं टाकलं आहे. कंपनीने नुकतंच तिचं जेट एडिशनही लॉन्च केलं आहे. या मॉडेल्सवर कोणतीही सूट मिळणार नाही: टाटा आपल्या सर्वात प्रसिद्ध कॉम्पॅक्ट SUV पंचसह Altroz ​​वर कोणतीही सूट देत नाही. मात्र गेल्या महिन्यात कंपनी Altroz ​​वर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत होती. त्याचप्रमाणे, टाटा टियागोच्या NRG आणि CNG मॉडेल्सवर कोणतीही सूट उपलब्ध नाही. टिगोरच्या सीएनजी मॉडेलवरही कोणतीही सूट नाही. कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tigor EV, Nexon EV आणि Nexon EV Max वर कोणतीही सूट देत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या