सुवर्णसंधी! Tata मोटर्सच्या 'या' कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, वाचा कोणत्या मॉडेलवर किती सूट?
मुंबई, 5 डिसेंबर: लवकरच 2022 हे वर्ष संपणार असून, 2023 सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्ही कार खरेदीचं नियोजन करत असलात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण डिसेंबर महिना सुरू होताच अनेक कार कंपन्यांनी डिस्काउंट ऑफर्स सुरू केल्या आहेत. टाटा ही देशातल्या प्रमुख कार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. टाटा मोटर्सने डिसेंबरमध्ये आपल्या निवडक मॉडेल्सवर 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देऊ केली आहे. यात टाटाच्या प्रमुख आणि लोकप्रिय अशा तीन कार मॉडेल्सचा समावेश आहे. यामुळे तुमचं कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्यासोबत हजारो रुपयांची बचतदेखील होईल. डिस्काउंट ऑफरमधली टाटा मोटर्सची कार मॉडेल्स कोणती आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या. डिसेंबर हा वर्षातला शेवटचा महिना सुरू होताच अनेक कार कंपन्यांनी खरेदीवर डिस्काउंट ऑफर्स घोषित केल्या आहेत. टाटा मोटर्सनेदेखील आपल्या निवडक मॉडेल्सवर 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. डिसेंबर महिन्यात टाटा टियागो, टाटा नेक्सन आणि टाटा टिगॉर या मॉडेल्सवर विशेष सूट मिळणार आहे; मात्र टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक गाड्यांवर सध्या तरी कोणताही डिस्काउंट किंवा ऑफर दिलेली नाही. याचा अर्थ तुम्ही टाटा निक्सॉन ईव्ही प्राइम, टिगॉर ईव्ही किंवा निक्सॉन ईव्ही मॅक्स यांपैकी कोणतीही कार खरेदी करण्याचं नियोजन करत असलात, तर तुम्हाला या कार खरेदीवर कोणताही डिस्काउंट मिळणार नाही. हेही वाचा: Super Bikeला दोन सायलेन्सर का बसवले जातात? वाचा इंटरेस्टिंग कारण टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्ही एसयूव्ही गाड्यांवर टाटा मोटर्सकडून 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात पाच हजार रुपयांचं कॉर्पोरेट डिस्काउंट, काही मॉडेल्सवर 30 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 30 हजार रुपयांच्या एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे. टाटा टियागो आणि टिगॉर या दोन्ही गाड्यांवर टाटा मोटर्स 38 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. याचाच अर्थ तुम्ही डिसेंबर महिन्यात पाच सीटरच्या या दोन्ही हॅचबॅकपैकी कोणतीही एक कार खरेदी केलीत, तर मोठी बचत होऊ शकते. यात 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, तीन हजार रुपयांचं कॉर्पोरेट डिस्काउंट आणि निवडक मॉडेल्सवर 15 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस दिला जात आहे. टाटा निक्सॉन या टाटा मोटर्सच्या सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारवर पाच हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही कार खरेदीचं नियोजन करत असलात, तर टाटाच्या या कारपैकी एका मॉडेलची निवड करून डिस्काउंट ऑफरचा फायदा मिळवू शकता.mgb