Renault Triber: 'या' 7 सीटर कारवर मिळतीये तब्बल 60 हजारांची सूट, उत्कृष्ट मायलेज अन् किंमतही परवडणारी
मुंबई, 06 ऑगस्ट: सुप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी रेनो (Renault) या महिन्यात आपल्या सर्वात जास्त मागणी असलेल्या MPV Triber वर उत्तम ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरनंतर तुम्ही ही कार आणखी स्वस्तात खरेदी करू शकाल. ही देशातील एक अशी 7 सीटर कार आहे, जिची किंमत अनेक 5 सीटर कारपेक्षा कमी आहे. तिचं मायलेजही चांगलं आहे. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीनंही ती खूप चांगली आहे. एवढंच नाही तर 7 प्रवासी बसल्यानंतरही लहान मुलांना बसता येईल एवढी जागा तिच्यात आहे. तसेच, सामान ठेवण्यासाठीही पुरेशी जागा आहे. कंपनीने 1 लाखांहून अधिक ट्रायबर्सची विक्री केली आहे. चला जाणून घेऊया ट्रायबरची फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि त्यावर उपलब्ध ऑफर्स. Renault Triber वर 60,000 ची सूट- Renault तिच्या सब फोर-मीटर MPV ट्रायबरवर 60,000 रुपयांची सूट देत आहे. मात्र, ही ऑफर महाराष्ट्र, गोवा, केरळ आणि गुजरातसाठी आहे. स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत 45,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि 10,000 रुपयांचे इतर फायदे असतील. त्याच वेळी, इतर राज्यांमध्ये, कंपनी यावर 55,000 रुपयांपर्यंत लाभ देत आहे. ही ऑफर Renault Triber च्या लिमिटेड एडिशनवर उपलब्ध नसेल. ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे. रेनो ट्राइबरचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
हेही वाचा- गुटखा शौकीन चोरांचा कारनामा! चोरला 10.50 लाख रुपयांचा विमल गुटखा रेनो ट्रायबरचं इंजिन- रेनो ट्रायबरमध्ये 1.0-लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे पेट्रोल इंजिन 71 एचपीची कमाल पॉवर आणि 96 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटीशी जोडलेले आहे. ही कार 18 ते 19 kmpl मायलेज देते. रेनो ट्रायबर RXE, RXL, RXT, लिमिटेड एडिशन, RXT Easy-R, RXZ, RXZ DualTone, Limited Edition Easy-R, RXZ Easy-R, RXZ Easy-R Dualtone या 10 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ग्लोबल NCAP कडून 4 स्टार रेटिंग प्राप्त- ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट रेटिंगमध्ये या कारला प्रौढांसाठी 4 स्टार आणि लहान मुलांसाठी 3 स्टार रेटिंग मिळालं आहे. सुरक्षेसाठी यात ड्रायव्हर, प्रवासी यांच्यासह साइड एअरबॅगचा समावेश आहे. ड्रायव्हरच्या सीटवर लोड लिमिटर आणि प्रीटेन्शनर देखील आहे. तिचं इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT शी जोडलेले आहे. या कारसोबत स्मार्ट कार्डची एक्सेसही उपलब्ध आहे.