JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / OLA भारतात उभारणार जगातला सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना; 10 हजार लोकांना मिळणार रोजगार

OLA भारतात उभारणार जगातला सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना; 10 हजार लोकांना मिळणार रोजगार

ओला (OLA) कंपनी आपला पहिला ई-स्कूटर कारखाना (E- Scooter Factory) भारतात उभारणार आहे. त्यासाठी 2,400 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 10000 लोकांना रोजगाराची संधी यातून मिळेल. कुठे असेल हा कारखाना?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 डिसेंबर:  App आधारित टॅक्सी सेवा देणारी ओला (OLA) कंपनी तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) आपला पहिला ई-स्कूटर  कारखाना (E- Scooter Factory) उभारणार आहे. याबाबत कंपनीने तामिळनाडू सरकारशी (Tamilnadu Government) करार केला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना उभारण्यासाठी कंपनी तब्बल 2,400 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच ही कंपनी सुरू झाल्यानंतर देशातील किमान दहा हजार लोकांना रोजगाराची संधी (Employment Opportunities) उपलब्ध होईल, असा दावा या कंपनीनं केला आहे. कंपनीनं सांगितलं की, सुरुवातीला ही कंपनी वर्षाकाठी 20 लाख वाहनं निर्माण करेल. इलेक्ट्रीक वाहनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतानुसार हा ई-स्कूटर उत्पादन कारखाना ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असेल, ओला कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय भविष्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. तसेच  स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर देशातील तांत्रिक कौशल्ये सुधारण्यासही मदत होईल. ओला कंपनीने असंही सांगितलं की, आपल्याकडील विशेष कौशल्यामुळे, मनुष्यबळ आणि लोकसंख्येमुळे भारत ई-वाहन उत्पादनाचं जागतिक केंद्र बनेल. कंपनी भारतासह अनेक देशांची ई- वाहनांची मागणी पूर्ण करेल ही कंपनी भारतासह युरोप, आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर देशांच्या मागणीची पूर्तता करेल, असं या कंपनीनं म्हटलं आहे. पुढील काही महिन्यांतच कंपनी ई-स्कूटरच्या पहिल्या मॉडेलची निर्मिती करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं सांगितलं की, पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत पहिली ई-स्कूटर बाजारात आणली जाईल. यापूर्वीचं कंपनीने 2021 पर्यंत भारतीय बाजारात इलेक्ट्रीक स्कुटर वाहन आणण्याचं लक्ष्य ठेवलं होता. या कंपन्यांसोबत ओलाच्या ई-स्कूटरशी स्पर्धा असेल पहिल्या वर्षात 10 लाख ई-स्कूटरची विक्री करण्याचं उद्दीष्टं ओला कंपनीचं आहे. ई-स्कूटर मार्केटमध्ये ओला कंपनीची बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, हीरो इलेक्ट्रीक (हीरो इलेक्ट्रीक) आदी कंपन्यांशी स्पर्धा असणार आहे. या कंपन्या आधीपासूनच भारतात इलेक्ट्रीक वाहनाची विक्री करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या