JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / नुसता धुरळा! आली नवी कोरी Mahindra Thar, सॉलिड लूक आणि फिचर्स तर...

नुसता धुरळा! आली नवी कोरी Mahindra Thar, सॉलिड लूक आणि फिचर्स तर...

भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्राने अखेर आपली लोकप्रिय Thar वरुन पडदा बाजूला केला आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या प्लांटमध्ये ही गाडी तयार करण्यात आली आहे.

0111

भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्राने अखेर आपल्या लोकप्रिय थार Thar वरुन पडदा बाजूला केला आहे. 2 ऑक्टोबर 2020 मध्येही गाडी लाँच होणार आहे.

जाहिरात
0211

Mahindra Thar मध्ये अपेक्षेप्रमाणे चांगलेच बदल करण्यात आले आहे. या गाडीला पाहिल्यावर तुम्हाला jeep ची आठवण होईल. ही गाडी नवी डिझाइन, मॉडर्न इंटिरिअर आणि बीएस6 मानकांसह तयार झाली आहे.

जाहिरात
0311

या नव्या Thar मध्ये दोन एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेंसर्स, आणि स्पीड अलर्ट सिस्टम सारखे फिचर्सही पाहण्यास मिळणार आहे.

जाहिरात
0411

नवीन thar ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असणार आहे. यात 2.2 लिटर mHawk डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 130 bhp ताकद आणि 320 Nm टॉर्क जनरेट करेल.

जाहिरात
0511

तर 2.0 लिटर mStallion TGDi पेट्रोल इंजिनही दिले आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स असणार आहे. पेट्रोल इंजिन हे150 bhp ची पॉवर आणि 320 Nm इतका टॉर्क जनरेट करेल.

जाहिरात
0611

महिंद्राने नवीन जनरेशनच्या Thar ला बॉक्सी लूकमध्ये सादर केले आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत नवी Thar जास्त रूंद आणि लांब आहे.

जाहिरात
0711

नवीन थार ही भारतात डिझाइन करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या प्लांटमध्ये ही गाडी तयार करण्यात आली आहे.

जाहिरात
0811

नवीन थार ही सहा रंगात उपलब्ध असणार आहे. यात रेड रेज (Red Rage), मिस्टिक कॉपर (Mystic Copper), नेपोली ब्लॅक (Napoli Black,), एक्वामरीन (Aquamarine), गॅलेक्सी ग्रे (Galaxy Grey ) आणि रॉकी बेज (Rocky Beige) हे रंग मिळतील.

जाहिरात
0911

या नव्या थारमध्ये अनेक नवे अंतर्गत बदल करण्यात आले आहे. यात टचस्क्रीन इंफोटेंटमेंट सिस्टम, अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅपल कार प्ले सपॉर्ट सारखे फिचर्स दिले आहे.

जाहिरात
1011

यात रूफ माउंटेड स्पीकर्स, नवीन MID यूनिट, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, लेदर अपहोल्स्ट्री, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्यूल एयरबॅग्स दिले आहे.

जाहिरात
1111

नव्या थारची बुकिंग ही 2 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या