JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत...

Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत...

Lamborghini sian roadster hybrid कार अशा प्रकारे डिझाईन केली आहे की, तुमची नजर या कारवरुन बाजूला हटणार नाही.

0107

बहुचर्चित स्पोर्ट्स कार लॅम्बोर्घिनी (Lamborghini) नेहमी दमदार स्टाईल आणि सुसाट वेगासाठी ग्राहकांना आकर्षित करते. त्यामुळे आता Lamborghini आपली हायब्रिड कन्वर्टिबल सुपरकार लाँच केली आहे.

जाहिरात
0207

मागील वर्षी झालेल्या फ्रँकफर्टमध्ये झालेल्या ऑटो शोमध्ये कंपनीने Lamborghini sian roadster hybrid सादर केली होती. त्यावेळी या कारने सर्वांची मनं जिंकली होती.

जाहिरात
0307

Lamborghini sian roadster hybrid कार अशा प्रकारे डिझाईन केली आहे की, तुमची नजर या कारवरुन बाजूला हटणार नाही. या कारच्या बाहेरील भागात कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. मागे लावलेल्या कार्बन फायबर विंगमधून तुम्ही कारचे इंजिन सुद्धा पाहू शकता.

जाहिरात
0407

ही कार 350 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते. त्यामुळे कारच्या एअरोडायनामिक्सवर कंपनीने जास्त भर दिला आहे.

जाहिरात
0507

या कारमध्ये V12 इंजिन दिले आहे. त्यामुळे या इंजिनमधून तुम्हाला 774 bhp इतकी पॉवर मिळते. त्यामुळे ही कार 350 किमी प्रतितास इतका वेग गाठू शकते.

जाहिरात
0607

Lamborghini sian roadster hybrid च्या कॉकपिट इंटरिअरवर जास्त भर दिला आहे. यात डिजिटल कन्फिगरेबल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि रेक्ड सेंट्रल कन्सोल दिले असून टचस्क्रीनही दिला आहे. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम Lamborghini ने इन-हाउस डिझाईन केले आहे.

जाहिरात
0707

विशेष म्हणजे, या कारचे आतापर्यंत फक्त 19 यूनिट तयार करण्यात आले होते आणि 19 चे युनिटची विक्री झाली आहे. Lamborghini sian roadster hybrid ची किंमत ही अंदाजे 3.6 मिलियन डॉलर इतकी असणार आहे. भारतीय चलनात या कारची किंमतही 27,05,71,320 रुपये इतकी आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या