Electric Scooter घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे समस्यांपासून बचाव होईल, तसंच आरामदायी प्रवास होण्यास मदत होईल.
स्कूटर घेऊन बाहेर पडल्यानंतर स्कूटरची बॅटरी कमी असल्यास, आधीच ज्या रस्त्यावरुन जात आहात त्याठिकाणी चार्जिंग पॉईंट आहे की नाही हे तपासा. याबाबत माहिती मिळाल्यानंतरच इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन बाहेर पडा.
सध्याच्या चार्जिंग स्थितीमध्ये बॅटरी किती रेंज देऊ शकते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. जितका लांब तुमचा प्रवास असेल, त्या हिशोबाने स्कूटर चार्ज नसल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ज्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन बाहेर पडाल, आणि रस्ते खराब असल्यास, खड्डे असल्यास स्कूटरची रायडिंग रेंज कमी होऊ शकते.