JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘व्ह्यु वन्स’ फीचरमधून आलेल्या प्रक्षोभक कंटेंटबाबत रिपोर्ट कसं करावं? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘व्ह्यु वन्स’ फीचरमधून आलेल्या प्रक्षोभक कंटेंटबाबत रिपोर्ट कसं करावं? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपनं आता ‘व्ह्यु वन्स’ हे फीचर आणलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोशल मीडियाचा वापर जसा वाढला तसे त्याचे अनेक दुष्परिणाम जाणवू लागले. या माध्यमातून लोकांच्या गोपनीय गोष्टी उघड होऊ लागल्या. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांचं प्रमाण वाढू लागलं. फेसबुक, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियानं ग्राहकांना जास्तीतजास्त सुरक्षितता देण्याचा प्रयत्न केला. आता व्हॉट्सअ‍ॅपही सुरक्षिततेबाबत विविध फीचर्स आणत आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘व्ह्यु वन्स’ या नव्या फीचरमुळे एखादा फोटो किंवा व्हिडिओ एकदाच पाहण्याची मुभा असणार आहे. मात्र या फीचरमुळे एखादा अनावश्यक किंवा प्रक्षोभक फोटो, व्हिडिओ आला, तर त्यावरही योग्य कारवाई करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबत ‘एबीपी लाईव्ह’नं वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपनं आता ‘व्ह्यु वन्स’ हे फीचर आणलं आहे. त्यामुळे एकदा व्हिडिओ किंवा फोटो पाहिल्यानंतर तो मीडियातून किंवा चॅटमधून निघून जाईल. पाठवणाऱ्या व्यक्तीला तो व्हिडिओ किंवा फोटो पाहिला गेल्याचा मेसेज मिळेल. ग्राहकांसाठी हे नवीन फीचर खूपच उपयुक्त ठरेल, मात्र काहीवेळा या माध्यमातून प्रक्षोभक किंवा भावना दुखावणारे मेसेजेस पाठवले जाऊ शकतात. यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास होऊ शकतो. अशा युजर्सना ब्लॉक करण्याची सोयही व्हॉट्सअ‍ॅपनं दिली आहे. अँड्रॉईड फोनवर ही सुविधा वापरण्यासाठी एका वेळेला पाहण्यासाठीचा फोटो किंवा व्हिडिओ ज्या चॅटवरून आला, त्यावर जावं. तो मेसेज उघडावा. स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या भागात 3 ठिपके असलेला जो पर्याय असतो, तो उघडावा. त्यात त्या मेसेज रिपोर्ट करण्याबाबत किंवा कॉन्टॅक्ट ब्लॉक करण्याबाबत पर्याय असतो. तो निवडून असे प्रक्षोभक मेसेज त्या युजरकडून पुन्हा येणार नाहीत, याची काळजी घेता येऊ शकते. आयफोन वापरकर्त्यांसाठी स्क्रीनच्या खालच्या भागात 3 ठिपके असलेल्या मेन्यु बटणावर क्लिक करावं. तिथे त्या कॉन्टॅक्टला रिपोर्ट करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्याची निवड करावी. अशाप्रकारे प्रक्षोभक मेसेजबाबत व्हॉट्सअ‍ॅपकडे तक्रार करता येऊ शकते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तो मेसेज पाहून त्या दृष्टीनं पाठवणाऱ्यावर योग्य कारवाई करतं किंवा त्याचं व्हॉट्सअ‍ॅप खातं बंद करतं. हेही वाचा -  कारला सेफ्टी रेटिंग कसं मिळतं? 5 स्टार मिळवण्यासाठी कोणती फीचर्स आवश्यक आहेत, जाणून घ्या ग्राहकांनी शक्यतो विश्वासू व्यक्तीलाच ‘व्ह्यु वन्स’ या पर्यायामधून फोटो किंवा व्हिडिओ पाठवावे. त्यामुळे यात असलेल्या खासगी माहितीचा दुरुपयोग होणार नाही. आलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट काढता येऊ नये किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करता येऊ नये, या साठी व्हॉट्सअ‍ॅपनं ‘व्ह्यु वन्स’ हे फीचर दिलेलं आहे. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या मेसेजबाबत अधिक सुरक्षा घेतली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या