JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / जेवण वाढण्यापासून ते कोरोना चाचणीपर्यंत! COVID-19 काळात माणसाचे मित्र ठरलेत हे Robot

जेवण वाढण्यापासून ते कोरोना चाचणीपर्यंत! COVID-19 काळात माणसाचे मित्र ठरलेत हे Robot

कोरोना काळात (Coronavirus) सोशल डिस्टन्सिंग, कोरोना टेस्ट इत्यादीसाठी विविध ठिकाणी तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले होते. अनेक देशांनी काही रोबोंचा (Robots) वापर केला होता. यामध्ये अगदी फूड सर्व्ह करण्यापासून ते कोरोना चाचणी करणारे रोबो विकसीत करण्यात आले आहेत.

0108

इजिप्तच्या तांटामध्ये कोरोना व्हायरसच्या (Covid19) दुसऱ्या लाटेच्या शक्यतेदरम्यान कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून रोबोच्या(Robot) मदतीने रुग्ण तपासणी केली जाणार आहे. यासाठी एका स्वयंसेवकांची तपासणी करताना सेरा-3 (Cera3) नावाचा रोबो या फोटोत दिसून येत आहे. (Photo: Reuters)

जाहिरात
0208

वुहान इंटरनॅशनल विमानतळावर रोबो पोलिसासह आरोग्य कर्मचारी या फोटोत दिसत आहेत. याच ठिकाणी कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. ( April 8, 2020-REUTERS/Aly Song)

जाहिरात
0308

सिंगापूरमधीळ एका पार्कमध्ये पेट्रोलिंग करताना हा चार पाय असणारा SPOT नावाचा रोबो दिसून येत आहे. सोशल डिस्टंन्सिंगचा अँबॅसिडर म्हणून हा रोबो काम करत आहे. (8 मे 2020- REUTERS/Edgar Su)

जाहिरात
0408

या फोटोत इटलीमधील वारेसे येथील सर्केलो रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करताना रोबो या फोटोत दिसत आहे. (1 एप्रिल 2020-Photo: Reuters)

जाहिरात
0508

5 नोव्हेंबर 2020 ला काढलेल्या या फोटोत रशियाच्या मॉस्कोमधील रेस्टोरंटमध्ये रोबो वेटरचे काम करताना दिसून येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य अंतर राखत सर्व्हिस करण्यासाठी रोबोचा वापर करण्यात आला आहे. REUTERS/Maxim Shemetov

जाहिरात
0608

कोचीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार कसा रोखावा याची माहिती देण्यासाठी हे दोन रोबो असिमोव रोबोटिक्स या स्टार्टअप कंपनीने तयार केले होते. या फोटोत दोन रोबो दिसून येत असून हातामधील ट्रेमध्ये सॅनिटायजर आणि मास्क दिसून येत आहेत. याचबरोबर रोबाने देखील मास्क घातल्याचे या फोटोत दिसून येत आहे. (17 मार्च 2020-REUTERS/SivaramV)

जाहिरात
0708

इजिप्तच्या कैरोमध्ये घेतलेल्या या फोटोमध्ये रोबो कोरोनाची PCR चाचणी करताना दिसून येत आहे. ईजिप्तमधील 26 वर्षीय मॅकेनिकल इंजिनिअर महमूद एल कोमी याने या रिमोट कंट्रोलवरील रोबोची निर्मिती केली आहे. (12 जून 2020- REUTERS/Mohamed Abd El Ghany)

जाहिरात
0808

मार्च 2020 मध्ये मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये घेतलेल्या या फोटोत एक महिला ड्रोनकडे पाहताना दिसून येत आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकंना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून नागरिकांवर पोलीस नजर ठेवत होते. (REUTERS/Lim Huey Teng)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या