JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / TVSने ‘या’ गाडीचं नाव Apache असं का ठेवलं? त्यावरील RTFI अन् RTRचा अर्थ काय? वाचा कुणालाच माहीत नसलेली गोष्ट

TVSने ‘या’ गाडीचं नाव Apache असं का ठेवलं? त्यावरील RTFI अन् RTRचा अर्थ काय? वाचा कुणालाच माहीत नसलेली गोष्ट

Apache ही टीव्हीएस कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. विशेषत: रेसिंगची आवड असलेल्या व्यक्ती अपाचेला जास्त पसंती देतात. पण, Apache या नावाचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

जाहिरात

TVSने ‘या’ गाडीचं नाव Apache असं का ठेवलं? त्यावरील RTFI अन् RTRचा अर्थ काय?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 नोव्हेंबर:  Apache ही टीव्हीएस कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. विशेषत: रेसिंगची आवड असलेल्या व्यक्ती अपाचेला जास्त पसंती देतात. उत्कृष्ट लूक असलेल्या या गाडीमध्ये अनेक अॅडव्हान्स्ड फीचर दिली जातात. कस्टमर्सची मागणी लक्षात घेऊन कंपनी दरवर्षी या फीचर्समध्ये अपग्रेडही करते. ही बाईक बाजारात अनेक रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध आहे. गाडीला स्पोर्टी लूक देण्यासाठी कंपनी त्यावर ग्राफिक्सचाही वापर करत आहे. पण, Apache या नावाचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हे नाव कुठून आले? या मागे कारण काय आहे? या गाडीवर आरटीएफआय आणि आरटीआर ही अक्षरं का लिहिलेली आहेत? चला…आज जाणून घेऊया याबद्दलची माहिती… अपाचे (Apache) शब्द कुठून आला? भारतीय लष्करात अपाचे नावाचं एक हेलिकॉप्टर समाविष्ट आहे. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत एक भारतीय जमात राहत आहे. या जमातीला अपाचे किंवा अपाचियन समुदाय म्हणतात. या दोन गोष्टींपैकी एकाला आधार मानून टीव्हीएस कंपनीनं आपल्या बाइकचं नाव अपाचे, असं ठेवलं असावं. कोणत्याही बाइकला नाव देण्यापूर्वी एक स्वतंत्र टीम त्याचा विचार करते. शिवाय, एकदा बाइक लाँच झाल्यानंतर कंपनी दरवर्षी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्नही करते. हेही वाचा: Mahindra Thar मॉडिफाय करणं पडलं महागात, न्यायालयानं सुनावली 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा आरटीएफआय म्हणजे काय? Apache बाईकमध्ये आरटीएफआय असतं. आरटीएफआय म्हणजे रेस ट्युन्ड फ्युएल इंजेक्शन. त्याच्या मदतीने, इंजिनला अधिक शक्ती देण्यासाठी आणि अधिक वेगाने धावण्यासाठी इंधन इंजेक्ट केलं जातं. त्यामुळे त्याला आरटीएफआय असं नाव देण्यात आलं आहे. Apache RTR 160 बाईकमध्ये सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. हे 8400आरपीएमवर 15बीएचपी पॉवर आणि 7000आरपीएमवर 13.9 एनएमचा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. इतकंच नाही तर यात पाच गिअरचा बॉक्स आहे.

आरटीआर म्हणजे काय? आरटीआर म्हणजे रेसिंग थ्रॉटल रिस्पॉन्स. अपाचे कंपनीच्या रेसिंग बाइक्समध्ये तुम्हाला हे फीचर पाहायला मिळेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, हे रेसिंगच्या दृष्टिकोनातून हे फीचर डिझाइन केलं गेलं आहे. या सीरिजमधील बाइकची किंमत एक लाख 18 हजार रुपयांपासून सुरू होते. याच अपाचे मॉडेलबद्दल बोलायचं झालं तर ती 160 आणि 180 सीसी अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. या दोन प्रकारांमध्येही तुम्हाला डिस्क, ड्रम आणि ब्लूटूथ व्हेरिएंट पाहायला मिळतील. 160सीसी मॉडेल लाल, काळा, राखाडी, निळा आणि पांढरा या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, 180 सीसी मॉडेल फक्त काळा आणि निळा या दोन रंगामध्ये उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या