JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / ऑटो अँड टेक / Mileage Bike: याच आहेत भारतातील सगळ्यात स्वस्त दुचाकी; मायलेज पण खिशाला परवडणारं

Mileage Bike: याच आहेत भारतातील सगळ्यात स्वस्त दुचाकी; मायलेज पण खिशाला परवडणारं

Best 5 Affordable Bikes: पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे तुम्हीही नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर या बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. या बाइक्स परवडणाऱ्या आहेत तसेच उत्कृष्ट मायलेजही देतात. याशिवाय त्यांची किंमतही कमी आहे.

0105

Hero HF Deluxe: ही एक मायलेज बाइक आहे, तिची सुरुवातीची किंमत 53,063 रुपये आहे. ही 5 प्रकार आणि 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे, तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 65,358 रुपये आहे. Hero HF Deluxe मध्ये 97.2cc BS6 इंजिन आहे. हे इंजिन 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते.

जाहिरात
0205

TVS Sport: TVS Sport बाईक केवळ 73 kmpl च्या मायलेजमुळेच नाही तर विविध सहा रंगांमध्ये उपलब्ध असल्याने ती खरेदीदारांचे लक्ष वेधून घेते. बाईकला सिंगल-सिलेंडर फोर-स्ट्रोक आणि एअर-कूल्ड स्पार्क इग्निशन सिस्टम आणि इंधन इंजेक्शन सिस्टम मिळते. बाइकला 10 लिटरची टाकी आहे. तिची किंमत 58,900 रुपयांपासून सुरू होते.

जाहिरात
0305

बजाज CT 110 : CT 110 हा CT 100 चा अधिक प्रीमियम प्रकार आहे. जे लोक थोडे जास्त पैसे खर्च करून अधिक फिचर घेण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. बाईकला LED DRL, रबर टँक पॅड, बंपर, जाड पॅडेड सॅडल, उठावदार एक्झॉस्ट आणि बरेच काही फिचर मिळतात. त्याचे 115.45 cc 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर इंजिन 7,000 rpm वर 8.6 hp आणि 5,000 rpm वर 9.81 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकची सुरुवातीची किंमत 58,200 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

जाहिरात
0405

बजाज प्लॅटिना 110: या बाईकला 115.5cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन यापूर्वी प्लॅटिनामध्ये चार गिअर्ससह उपलब्ध होते. 115cc इंजिन 8.6PS पॉवर आणि 9.81Nm टॉर्क जनरेट करते. परंतु, इंजिन पूर्वीपेक्षा चांगले आहे, कारण ते अधिक अपडेट केले गेले आहे. गीअरबॉक्सवर जास्त भर दिल्यानंतरही इंजिन स्मूथ असल्याचे दिसते. जास्त वेगात चालवल्यास या बाईकमध्ये फक्त थोडा कंपन जाणवतो. तिची किंमत 63,300 पासून सुरू होते.

जाहिरात
0505

TVS Star City Plus: या यादीतील TVS ची दुसरी बाईक 70 kmpl च्या मायलेजसह चांगली इंधन-कार्यक्षम बाइक आहे. मात्र, बजाज प्लॅटिना 110 च्या तुलनेत या रेंजमध्ये स्टार सिटी प्लसची किंमत जास्त (70,000) असली तरी पैसा वसुल आहे. सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, फोर-स्ट्रोक इंजिनमधून तिला दमदार पॉवर मिळते. बाईकच्या टाकीत 10 लिटर पेट्रोल बसते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या