मुंबई, 4 ऑक्टोबर : नवीन वाहनांप्रमाणेच सेकंड हँड कारचा बाजारही सध्या तेजीत आहे. कमी बजेटमध्ये चांगली कार घेण्याची इच्छा लोकांना सेकंड हँड कार मार्केटकडे घेऊन जाते. या कार मार्केटमध्ये, तुम्हाला बजेट कारपासून ते लक्झरी कार्सपर्यंत अत्यंत कमी किमतीत विकल्या जाताना दिसतील. तुम्हीही असाच विचार करुन आकर्षक डील पाहून गाडी घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण, हे तुम्हाला अडचणीत आणू शकते. सेकंड हँड कार मार्केटमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑफर पाहायला मिळतील, पण येथून कार घेण्यापूर्वी काही गोष्टींचा तपास करणे देखील आवश्यक आहे. सेकंड हँड कार मार्केटमध्ये उपलब्ध असलेली वाहने नेहमी योग्य असतील असं नाही. त्यांचे अनेक डीलरही आहेत, जे तुम्हाला बनावट वाहने देऊन गायब होतात किंवा त्या वाहनांवर काही खटला सुरू असतो. अशावेळी तुमची गाडी तुम्हाला अडचणीत आणू शकते. रजिस्ट्रेशन तपासा सेकंड हँड वाहन खरेदी करण्यापूर्वी संबंधित आरटीओमध्ये त्याची नोंदणी तपासा. आजकाल कारची नोंदणी देखील ऑनलाइन तपासली जाऊ शकते. यावरून वाहनावर चलनची थकबाकी नसल्याचे कळते. तसेच कारचा कर पूर्ण भरला आहे की नाही. संबंधित वाहनातून काही गुन्हा घडला असेल तर त्याचीही माहिती मिळेल. वाचा - पालघरमध्ये ई-स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू! तुम्ही वापरत असाल तर अशी घ्या काळजी? कंपनी रेकॉर्ड पहा प्रत्येक कारचा त्याच्या कंपनीत रेकॉर्ड असतो. कारच्या नोंदणी क्रमांकाशी संबंधित ब्रँडच्या कार्यशाळेत तुम्ही हे रेकॉर्ड तपासू शकता. या रेकॉर्डमध्ये, आपण कारची किती वेळा सर्व्हिसिंग केली आहे किंवा वाहनाची कोणती दुरुस्ती केली आहे हे जाणून घेता येते. हे आपल्याला वाहनाच्या स्थितीचे अचूक मूल्यांकन करण्यात मदत करेल. यासोबतच गाडी किती चालली आहे याची अचूक माहितीही मिळेल.
विमा तपासा विम्याशिवाय कधीही कार खरेदी करू नका. कायदेशीर पेच असल्यास विमा कंपन्यांकडून कारचा विमा केला जात नाही. त्यामुळे ज्याचा विमा वैध असेल तीच कार खरेदी करा. त्वरित ट्रान्सफर करा कार खरेदी केल्यानंतर, ती ताबडतोब तुमच्या नावावर हस्तांतरित करा. असे केल्याने तुम्ही केवळ कारचे मालक होत नाही, तर या वाहनावर अन्य कोणी दावा तर केला नाही ना? हे देखील समजते.