Mahindra Thar मॉडिफाय करणं पडलं महागात, न्यायालयानं सुनावली 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई, 21 नोव्हेंबर: अलीकडच्या काळात तरूणाना काहीतरी हटके करायचा जणू नादच लागलाय. काहीतरी करून लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी लोक विविध गोष्टी करत असतात. काही कारचे शौकीन असलेले लोक त्यांची कार झक्कास दिसावी म्हणून तिला मॉडिफाय करतात. महिंद्रा थार ही कार तर अनेकांची आवडती कार..या कारमध्ये विविध प्रकारचं मॉडिफिकेशन करून तिचा लूक आणखी वाढवता येतो. कित्येक लोक मॉडिफिकेशनवर मोठी रक्कम खर्च करतात. परंतु महिंद्रा थार मॉडिफाय करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील न्यायालयानं हे नियमांचं उल्लंघन मानून त्याला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार आदिल फारुख भट्ट यानं त्याच्या महिंद्रा थारमध्ये बेकायदेशीर बदल केले आहेत, जे मोटार वाहन कायद्याच्या कलम 52 चे थेट उल्लंघन आहे. कोर्टाच्या म्हणण्यानुसार भट्ट यानं वाहनाच्या संपूर्ण रचनेत बदल केला, परंतु कारच्या नोंदणीमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. मात्र आरोपीलाही कोर्टाकडून दिलासा मिळाला असून त्याला प्रोबेशनचा लाभ देण्यात आला आहे, त्यानंतर त्याला या गुन्ह्यासाठी तुरुंगात जावं लागणार नाही तर त्याला 2 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर सोडण्यात आलं आहे. आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळं आणि यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी नसल्यानं त्याला दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं न्यायालयाचं म्हटलं आहे. परंतु भट्ट याने या काळात कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तन केलं तर त्याला 6 महिने तुरुंगवास भोगावा लागेल. हेही वाचा: शक्यच नाही! अवघ्या 24 तासांत सोल्ड आउट झाली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, काय आहे तिची खासियत? थारमध्ये काय केलं होतं मॉडिफिकेश-
आता काय होणार? टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यायालयानं श्रीनगरस्थित आरटीओला सायरनसह वाहनातील सर्व बदल काढून टाकण्याचे आदेश दिले. भट्ट याला आता कंपनीकडून आलेल्या मूळ वाहनाप्रमाणं आरसीमध्ये नमूद केलेल्या माहितीप्रमाणं वाहन करावं लागणार आहे.