बाबो! इथं कार पार्किंगसाठी मोजावे लागतात 2.45 कोटी रुपये, पाहा खास पार्किंगचा झक्कास Video
मुंबई, 24 नोव्हेंबर: आजकाल कोणत्याही सोसायटीत फ्लॅट किंवा व्हिला खरेदी करण्यासोबतच पार्किंगसाठी जागाही खरेदी करावी लागते. यासाठी तुम्हाला 1 ते 5 लाख रुपये द्यावे लागतात. पण तुम्हाला कधी पार्किंग स्पॉट मिळवण्यासाठी एका वर्षासाठी 2.45 कोटी रुपये मोजावे लागतील, असं सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. एवढे पैसे तुमच्याकडे असतील तर तुम्ही दिल्ली मुंबईसारख्या ठिकाणी लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता, पण एवढे पैशात तुम्ही न्यूयॉर्कमधील एका सोसायटीमध्ये केवळ कार पार्किंगच घेऊ शकता, तेही कायमस्वरूपी नव्हे तर केवळ एकाच वर्षासाठी. CNBC च्या रिपोर्टनुसार, ही एक रोबोटिक पार्किंग स्पेस आहे. हे अंडरग्राउंड पार्किंग असून आणि लिफ्टच्या मदतीनं तुमचं वाहन स्वयंचलितपणे पार्किंगच्या ठिकाणी पोहोचते. यामध्ये वाहनचालकाला पार्किंगच्या ठिकाणी जावं लागत नाही. टोल ब्रदर्सनी बांधलेल्या लक्झरी 140 कॉन्डो युनिट्सच्या खाली असलेल्या या पार्किंगच्या जागेची किंमत वर्षाला 300,000 डॉलर आहे. त्याच वेळी या कॉन्डोची किंमत सुमारे 9.45 दशलक्ष डॉलर आहे. हे कसं काम करतं?
हेही वाचा: फक्त 72 सेकंदात चार्ज होईल Electric Car, येत आहे खास तंत्रज्ञान
फक्त 2.15 मिनिटांत पार्किंगच्या बाहेर- या इंटेलिजेंट पार्किंग सिस्टीम स्पॉटमधून तुमचं वाहन बाहेर काढण्यासाठी देखील खूप कमी वेळ लागतो. या पार्किंगच्या ठिकाणापासून वाहन चालकापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 2.15 मिनिटे लागतात. विशेष म्हणजे तुमची कार अशा प्रकारे पार्क केलेली असते की ती बाहेर ड्रायव्हरपर्यंत पोहोचते तेव्हा समोरचा भाग बाहेर पडण्याच्या दिशेने असतो. याचा अर्थ वाहन पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठी कार बॅक करण्याची गरज नाही.
इलेक्ट्रिक कारसाठी जास्त पैसे मोजावे लागतील- सामान्य कारसाठी या पार्किंगची किंमत 3 लाख डॉलर्स आहे, तर इलेक्ट्रिक कारसाठी, या पार्किंगसाठी 50 हजार डॉलर्स अधिक मोजावे लागतील. एका वर्षासाठी ईव्ही पार्किंगसाठी 3.5 लाख डॉलर्स द्यावे लागतील.