JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून दोन गटात तुफान राडा; जबरी मारहाणीत महिलेचा गर्भपात

औरंगाबादमध्ये शेतीच्या वादातून दोन गटात तुफान राडा; जबरी मारहाणीत महिलेचा गर्भपात

आज सकाळी औरंगाबाद शहरातील जटवाड्यात एक भयानक दृश्य पाहायला मिळालं आहे. याठिकाणी शेत जमिनीच्या वादातून (Agricultural Land dispute) दोन गटात झालेल्या बाचाबाचीनंतर एका महिलेवर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला (Attack on pregnant women) केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 30 एप्रिल: आज सकाळी औरंगाबाद शहरातील जटवाड्यात एक भयानक दृश्य पाहायला मिळालं आहे. याठिकाणी शेत जमिनीच्या वादातून (Agricultural Land dispute) दोन गटात झालेल्या बाचाबाचीनंतर एका महिलेवर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला (Attack on pregnant women) केला आहे. या हल्ल्यातील संबंधित महिलेचा गर्भपातही (Abortion) झाल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Viral Video) होतं असून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. औरंगाबादच्या जटवाडा याठिकाणी शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर अचानक या घटनेचं रुपांतर मारहाणीत झालं आहे. या मारहाणीत एका महिलेला जबरी मारहाण करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेत तिचा गर्भपात झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीनं केला आहे. संबंधित महिलेवर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या घटनेशी संबंधित असणाऱ्या काही आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेत नेमक्या किती लोकांना दुखापत झाली याची माहिती समोर आली नाही. पण एका महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हे वाचा- पुण्यातील खाजगी फार्म हाऊसवर पालिका अधिकाऱ्यांची ठेकेदारांसह पार्टी, 9 जण अटकेत या मारहाणीबाबत मेडिकल अहवालाच्या अद्याप प्रतीक्षेत आहे. मेडिकल अहवाल समोर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलाचं तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या