प्रतिकात्मक फोटो
औरंगाबाद, 18 मे : औरंगाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीची हत्या (Murder in Gangapur) करुन त्याचे शिर गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Head Missing Dead Body) लक्ष्मण रायभाग नाबदे, असे 55 वर्षीय मृताचे नाव आहे. ते गंगापूरच्या अहिल्यादेवी नगर येथे राहत होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वैजापूर मार्गावर माजंरी शिवारातील तलावाच्या कडेला असलेल्या विहिरीत पुरुषाचा मृतदेह आढळला. या मृतदेहाचे शिर गायब असल्याचे एकच खळबळ उडाली आहे. अशी आली घटना समोर - वसंत सुराशे यांचे मादलपूर शिवारातील गट क्र. 45 मध्ये त्यांचे शेत आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा महेंद्र सुराशे हा विहिरीकडे चक्कर मारण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला विहिरीत शिर नसलेला व नग्न अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह आढळला. याप्रकारानंतर खळबळ उडाली. यामुळे शिर शोधण्यासाठी पूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. तर दुसरीकडे लक्ष्मण नाबदे हे शनिवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी सकाळीच दिली होती. त्यांच्या अंगठ्यावरुन हा मृतदेह लक्ष्मण यांचा आहे, असे त्यांच्या मुलांनी सांगितले. दोघांनी दिली खुनाची कबूली तर एक अजूनही फरार… याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले. सचिन सोमिथाथ गायकवाड (वय 20), शुभम विनोदकुमार नाहटा (23, रा. गंगापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबूली दिली. तर तिसरा आरोपी विशाल नामदेव गायकवाड (वय 23, रा. रांजणगाव पोळ) हा फरार आहे. हेही वाचा - अनैतिक संबंधावरुन संशय, पत्नीने केले पतीच्या गुप्तांगावर वार; डोक्यात दगड घातून पतीला संपविले
शिर नसलेल्या या मृतेदहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मृताच्या मुलांना मृतदेहाची ओळख झाल्याने त्याची उकल झाली आहे. दरम्यान, वैजापूर मार्गावर मांजरी शिवारातील तलावाच्या बाजूला असलेल्या विहिरीत पुरुषाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.