JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / कोविन अ‍ॅप हॅक करुन डोस न घेतलेल्यांना प्रमाणपत्र?, औरंगाबाद पालिकेची पोलिसात तक्रार

कोविन अ‍ॅप हॅक करुन डोस न घेतलेल्यांना प्रमाणपत्र?, औरंगाबाद पालिकेची पोलिसात तक्रार

Cowin application Hack: राज्यात कोविन अ‍ॅप हॅक (cowin application registration) झाल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 30 ऑगस्ट: राज्यात कोविन अ‍ॅप हॅक (cowin application registration Hack) झाल्याची घटना समोर आली आहे. कोविन अ‍ॅप हॅक करुन डोस (Corona Vaccination) न घेताच लसीचं प्रमाणपत्र मिळवणारं रॅकेट सक्रिय झालं आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad)28 ऑगस्टला हा प्रकार घडला आहे. आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या DKMM केंद्रावर हा प्रकार घडला असून कोरोना लसीकरण झालेल्या लाभार्थींच्या ऑनलाईन नोंदणीत हॅकिंग झाली आहे. हॅकिंग (Hacking) झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनानं पोलिसांकडे केली आहे. लस न घेता केवळ प्रमाणपत्रासाठी काही लोकांनी कोविन पोर्टल किंवा अ‍ॅप हॅक करत अशा नोंदी केल्याचा प्राथमिक संशय आहे. दिव्य मराठीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. राज्यात Night Curfew लागणार?, राजेश टोपेंनी दिली माहिती नेमका कसा बळावला संशय डीकेएमएम महाविद्यालयात शनिवारी लसीकरण सुरु होतं. त्यावेळी डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या कमी होती. 55 टोकन पहिल्या टप्प्यात वाटले होते. प्रत्येक व्यक्तीचं आधी रजिस्टरमध्ये नोंदणी केली जात होती. त्यानंतर कोविन पोर्टलमध्ये नोंद घेतली जात होती. 55 जणांचं लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदी बरोबर झाल्या आहेत का हे पाहण्यासाठी अ‍ॅप तपासले. त्यावेळी त्यांना या केंद्रावर 71 जणांच्या नोंदी दिसल्या. लगेचच खान यांनी ही माहिती वॉररुमच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यानंतर राठोड यांनी तात्काळ या केंद्रावरील लसीकरण थांबवलं. आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा आणि अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे यांना याबाबतची माहिती दिली. अनिल परब यांना ईडीची नोटीस, भाजपची पहिली प्रतिक्रिया आतापर्यंत ऑपरेटर शकील हे या केंद्रावर स्वतःच्या पर्सनल लॅपटॉपवरुन ऑनलाईन नोंदणी करत होते. मात्र शनिवारी पहिल्यांदाच त्यांनी महाविद्यालयाचा कॉम्प्युटर नोंदणी करण्यासाठी वापरला आणि त्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान तक्रारीनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. तसंच या प्रकरणी संपूर्ण चौकशी होईपर्यंत DKMM हे केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या