औरंगाबाद, 02 जुलै: लॉकडाऊनमध्ये घरी जाऊन कराटे (Taekwondo teacher) शिकवणाऱ्या 41 वर्षीय शिक्षकानं एका अठरा वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात (Student trap in love) ओढल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी अठरा वर्षांची होताचं, सज्ञान झाल्याचा आधार घेत कराटे शिक्षक तिला आपल्या घरी घेऊन गेला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी कराटे शिक्षकाच्या घरी जाऊन तिला परत आणण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनेच घरी येण्यास नकार दिल्यानं कुटुंबीय तोंडघशी पडले आहेत. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कुटुंबांतील तणाव शांत केला आहे. संबंधित मुलगी ही पुंडलिकनगर येथील रहिवासी असून बीए प्रथम वर्षाची विद्यार्थीनी आहे. संबंधित मुलगी मागील काही महिन्यांपासून 41 वर्षीय कराटे शिक्षकाकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. दरम्यान मैत्रीत वाढून जवळीक निर्माण झाली. यानंतर कराटे शिक्षक राजूनं लॉकडाऊनच्या काळात मुलीला घरी जाऊन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. कालांतरानं त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण मुलगी अल्पवयीन असल्यानं कराटे शिक्षकानं कोणतीही हालचाल केली नाही. पण बुधवारी तिचा 18 वा वाढदिवस होताच, गुरुवारी 1 जुलै रोजी तिला आपल्या घरी घेऊन गेला आहे. हेही वाचा- पतीनेच केला पत्नीचा सौदा,गुप्तांगात मिरची पूड टाकून मित्रांकडून सामूहिक बलात्कार संबंधित घटना समोर येताचं, कुटुबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. विशेष म्हणजे संबंधित कराटे शिक्षक मुलीच्या घरी नेहमी ये-जा करत असायचा. त्यामुळे त्याचे मुलीच्या घराच्यांसोबत चांगले संबंध होते. तो संबंधित मुलीला आपली भाची मानायचा. पण संधी मिळताचं त्यानं सर्वांचा विश्वास तोडत मुलीला आपल्या घरी घेऊन गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कराटे शिक्षकाचे यापूर्वी दोन विवाह झाले आहेत. त्याला दुसऱ्या बायकोपासून तेरा आणि सोळा वर्षांच्या दोन मुलीही आहेत. हेही वाचा- अल्पवयीन मोलकरणीवर लैंगिक अत्याचार, गर्भवती झाल्यामुळे प्रकरणाला वाचा मुलीचं कुटुंबीय जेव्हा शिक्षकाच्या घरी पोहचले, तेव्हा संबंधित मुलीनं घरी परत यायला नकार दिला. यामुळे दोन्ही कुटुंबीयांत तणाव वाढत गेला. यानंतर संबंधित मुलीनेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं कोणाचंही ऐकलं नाही. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची समजूत काढली. तसेच कराटे शिक्षकाच्या दुसऱ्या पत्नीला देखील याचा काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे संबंधित मुलगी पुन्हा कराटे शिक्षकाच्या घरी राहायला गेली आहे.