JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / Swarajya Dhwaj: भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज नगरमधील शिवपट्टण किल्ला परिसरात, 74 मीटर उंच ध्वज अभिमानाने फडकला

Swarajya Dhwaj: भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज नगरमधील शिवपट्टण किल्ला परिसरात, 74 मीटर उंच ध्वज अभिमानाने फडकला

Swarajya Dhwaj at Kharda Shivpatttan Fort: देशातील सर्वात उंच भगवा ध्वज डौलाने आणि अभिमानाने शिपट्टण किल्ल्यावर फडकला.

जाहिरात

खर्डा येथे भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज, 74 मीटर उंच ध्वज अभिमानाने फडकला (Photo: Twitter)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 15 ऑक्टोबर : देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज (Swarajya Dhwaj) अहमदनगरमधील (Ahmednagar) शिवपट्टण किल्ल्यावर (Shivpattan Fort) डौलाने फडकला आहे. या ध्वजाची उंची 74 मीटर इतकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांच्या अनोख्या संकल्पनेतून उतरलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (Kharda) येथील शिवपट्ट्ण किल्ल्यावर पार पजला आहे. या भव्य प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहण सोहळ्याला राज्यभरातून अनेक माननीय अतिथी उपस्थित होते. 74 मीटर उंचीने नवी ओळख महाराष्ट्राला मिळवून देत जगातील आज देशातील सर्वात उंच असल्याचा दावा केला जात आहे. कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणाऱ्या या ध्वजाची 74 मीटर अशी विक्रमी उंची आहे.

37 दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, 96 शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचला. त्यानंतर हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहणार आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जून 1674 रोजी  झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार 96X64 फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन 18 टन असून नुसत्या ध्वजाचे वजन 90 किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. ‘स्वराज्य ध्वज’ उभारणी करून ऐतिहासिक वारसा जपणे, पुढील पिढीला स्वराज्याच्या अकल्पित शौर्याची, मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय जेथे झाला त्या खर्डा किल्ल्याच्या इतिहासाची महती सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या शौर्याचे, पराक्रमाचे नवे आयाम स्थापित करून विश्व स्तरावर महाराष्ट्राची महती अजरामर करणाऱ्या मावळ्यांच्या कीर्तीची साक्ष असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टन म्हणजेच खर्डा किल्ल्याच्या आवारात दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या