JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अहमदनगर / ज्येष्ठ नागरिकाला दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO

ज्येष्ठ नागरिकाला दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO

एका ज्येष्ठ नागरिकाला दंश करून शेजारीच लपून बसलेल्या कोब्राला मारण्यासाठी (Family brings JCB machine to search and kill Kobra snake) कुटुंबीयांनी थेट जेसीबी मशीन मागवलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 22 ऑक्टोबर :  एका ज्येष्ठ नागरिकाला दंश करून शेजारीच लपून बसलेल्या कोब्राला मारण्यासाठी (Family brings JCB machine to search and kill Kobra snake) कुटुंबीयांनी थेट जेसीबी मशीन मागवलं. कोब्रा हे नाव ऐकूनच अनेकांचा थरकाप उडतो. भारतातील अतिविषारी असणाऱ्या या नागाच्या विषाचे एक ते दोन (Ultra poisonous snake) थेंबदेखील माणसाचा जीव जाण्यासाठी पुरेसे ठरतात. अहमदनगरमध्ये एक कोब्रा नाग एका कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाला चावला. त्यानंतर या कुटुंबाला (Digging sand with JCB) एवढी भीती वाटायला लागली की त्यांनी थेट जेसीबी मशीन मागवून जमीन खणायला सुरुवात केली.

कोब्राची दहशत अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात एका ज्येष्ठ नागरिकाला डसलेला साप नेमका कुठं गेला, याची जोरदार चर्चा सुरू होती. या नागाला एका मोकळ्या ठिकाणी काहीजणांनी अखेरचं पाहिलं होतं. त्याच ठिकाणी सापाचा शोध घेण्याचं निश्चित झालं आणि कुटुंबीयांनी जेसीबी मशीन मागवून जमीन खणायला सुरुवात केली. सर्पमित्रांचं पाचारण कोब्रा नागाला मारण्यासाठी जमीन खणली जात असल्याचं समजल्यावर सर्पमित्र आकाश जाधव त्या ठिकाणी पोहोचले आणि नागाला न मारण्याची विनंती केली. नागाचा जीव वाचवण्याचा निर्धार त्यांनी केला आणि जर कोब्रा सापडला तर त्याला आपण घेऊन जाणार असल्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलं. ग्रामस्थांनी ही बाब मान्य केली आणि आकाश जाधवदेखील त्या गावात थांबले. जमिनीत सापडला नाग काही काळ जमीन खणल्यानंतर तिथं कोब्रा बसल्याचं दिसलं. एका खड्ड्यातून तो अचानक वर आला आणि आजूबाजूच्या गोंधळाने चिडलेल्या कोब्राने फणा काढला. त्याचं आक्रमक रुप पाहून उपस्थितांना चांगलीच धडकी भरली. सर्पमित्र जाधव यांनी त्यांचं कसब पणाला लावत कोब्राला अलगद पकडलं आणि जंगलात नेऊन सोडलं. कोब्राला डोळ्यादेखत गावाबाहेर जाताना पाहून गावकऱ्यांनीदेखील सुटकेचा निश्वास सोडला. हे वाचा- विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या, पत्नीनेही पेटवून घेत संपवलं जीवन सापांना मारण्याची भीती अनेकदा साप आणि नाग यांची दहशत वाटल्याने त्यांना मारण्याचे प्रकार घडतात, असं जाधव यांनी म्हटलं आहे. आपण वेळीच  तिथे पोहोचलो नसतो, तर जेसीबीच्या साहाय्यानं नागाला मारून टाकण्याचीच योजना होती. मात्र ते वेळेत घटनास्थळी पोहोचले आणि नागाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ आकाश जाधव यांनी यूट्यूबवर अपलोड केला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या