advertisement
होम / फोटोगॅलरी / Explainer / कबर भाड्याने, आत्महत्येसाठी मदतनीस.. येथे अंत्यसंस्काराच्या पद्धतीच जगावेगळ्या

कबर भाड्याने, आत्महत्येसाठी मदतनीस.. येथे अंत्यसंस्काराच्या पद्धतीच जगावेगळ्या

नेदरलँडमधील अंत्यसंस्काराचे पर्याय पाहिले तर तुम्हालाही धक्का लागल्यावाचून राहणार नाही.

01
जगभरात अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा पाहायला मिळतात. त्यापैकी काही सांस्कृतिक कारणांमुळे तर काही आर्थिक कारणांमुळे विकसित झाल्या आहेत. नेदरलँड हा असाच एक देश आहे. जो अंत्यसंस्कारांच्या वेगळ्या आणि विचित्र परंपरा आणि पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी चक्क भाड्याने कबर मिळते. आत्महत्या मदतनीस, विशेष शवपेटी आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्या नेदरलँडला वेगळं बनवतात. (प्रतिनिधी फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

02
वाचायला विचित्र वाटेल पण इथं कबर विकत घेण्याऐवजी 20 वर्षांसाठी भाड्याने घेतली जाते. त्यानंतर ते अवशेष सार्वजनिक कबरीत नेले जाते. नेदरलँडमध्ये जागेच्या कमतरतेमुळे ही प्रथा सुरू झाली आहे. येथे सुमारे 20 लाख कबरी आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन मृतदेह पुरलेले आहेत. अशा स्थितीत एकाच कुटुंबातील लोकांच्या शवपेट्या एका वरती एक गाडल्या गेल्याचे पाहायला मिळत आहे. थडग्यांचे भाडेही अनेक पटीने वाढले आहे. (प्रतिनिधी फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

03
जर एखाद्या व्यक्तीला खूप वेदनादायक आजार असेल आणि त्याचा मृत्यू निश्चित असेल तर तो इच्छामरणासाठी अर्ज करू शकतो. सरकारला अर्ज योग्य वाटला तर परवानगी दिली जाते. 2002 पासून येथे इच्छामरण कायदेशीर आहे. (प्रतिनिधी फोटो: शटरस्टॉक)

04
नेदरलँडमध्ये कंपोस्टेबल कॉफिन (शवपेटी) देखील मिळते. ज्यांना जिवंत शवपेटी देखील म्हणतात, एका डच स्टार्टअपने डिझाइन केली आहे. आता बरेच पर्याय लोकांना उपलब्ध आहेत. बुरशी, सेंद्रिय विघटनशील पदार्थांपासून बनवलेल्या अनेक शवपेटी मिळतात, ज्यामुळे शरीराचे नैसर्गिक विघटन होऊ शकते. येथे लोकांच्या नैसर्गिक दफन करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये शवपेटीशिवाय त्यांना आच्छादनात बांधले जाते आणि मातीच्या स्वाधीन केले जाते. (प्रतिनिधी फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

05
अनाथ लोकांसाठी देखील नेदरलँड्समध्ये वेगळी सुविधा आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी ज्यांचे कोणी मित्र किंवा कुटुंबीय नसतात अशा लोकांसाठी त्यांच्या स्मरणार्थ कविता लिहिण्याची सोय आहे. 2002 मध्ये स्थापन झालेल्या एकल फ्युनरल फाउंडेशन, अनाथ मृत आणि त्यांच्या जीवनाच्या स्मरणार्थ कविता सादर करतात. एकल लोकांना आपण एकटे नसल्याची जाणीव करून देणे हा यामागचा उद्देश आहे. (प्रतिनिधी फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

06
नेदरलँडमधील अनेक कुटुंबे दाह संस्कार निवडतात. असं केल्याने तुम्ही पेटीत किंवा मातीत बांधले जात नाही. आपल्या प्रियजनांची अस्थी त्यांच्या आवडत्या ठिकाणी अपर्ण करता येते, अशी यामागे भावना आहे. हा पर्याय स्वस्त देखील आहे. यासोबतच लोकांना मृत्यूपूर्वी अवयव दान करण्याची सुविधा देखील आहे. मात्र, हा पर्याय त्यांना त्यांच्या 18व्या वाढदिवसाला निवडावा लागतो. (प्रतिनिधी फोटो: shutterstock)

07
नेदरलँड्समध्ये अंत्यसंस्कारावेळी डच लोक तात्काळ उपस्थित राहतात. मृतदेह जास्त काळ ठेवत नाहीत. सहा दिवसांत अंत्यसंस्काराच्या सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात, असा तिथला कायदा आहे. येथे अंतिम संस्कार सामाजिक कमी आणि कौटुंबिक अधिक आहेत. औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कुटुंबाला एकटं सोडलं जातं. (प्रतिनिधी फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

  • FIRST PUBLISHED :
  • जगभरात अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा पाहायला मिळतात. त्यापैकी काही सांस्कृतिक कारणांमुळे तर काही आर्थिक कारणांमुळे विकसित झाल्या आहेत. नेदरलँड हा असाच एक देश आहे. जो अंत्यसंस्कारांच्या वेगळ्या आणि विचित्र परंपरा आणि पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी चक्क भाड्याने कबर मिळते. आत्महत्या मदतनीस, विशेष शवपेटी आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्या नेदरलँडला वेगळं बनवतात. (प्रतिनिधी फोटो: विकिमीडिया कॉमन्स)

    MORE
    GALLERIES