JOIN US
मराठी बातम्या / Viral / ‘वाह क्या बात है’! तरुणांनी मातीपासून बनवली Bugatti कार, रस्त्यावर येताच लोकं म्हणतात...

‘वाह क्या बात है’! तरुणांनी मातीपासून बनवली Bugatti कार, रस्त्यावर येताच लोकं म्हणतात...

ही देसी जुगाड वाली गाडी बनवण्याचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: या जगात लोक प्रचंड क्रिएटिव्ह (creative) आहेत. त्यांची क्रिएटिव्हीटी (creativity) पाहून कधीकधी असं वाटतं की इतकं भन्नाट कसं सुचतं राव लोकांना. काहींचे जुगाड आणि क्रिएटिव्हीटी तर अशी असते ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. आजकाल वेस्टपासून बेस्ट (best from waste) म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे. आजकालची तरुण पिढी हा ट्रेंड (trend) पुढे नेण्याचं काम करतीये. अगदी कचऱ्यात फेकलेल्या वस्तूंपासून चांगली वापरण्यासारखी वस्तू बनवली जाते. आता तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काही तरुणांनी टाकाऊ वस्तूंपासून चक्क कार (car) बनवली आहे. होय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. ही देसी जुगाड वाली गाडी बनवण्याचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कोट्यवधी रुपयांची बुगाटी खरेदी करण्याची काय गरज आहे, जेव्हा तुमच्याकडे करोडो रुपयांची क्रिएटिव्हिटी आणि स्कील्स आहेत’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप व्हायरल (viral) झाला असून मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. चला तर पाहुया या व्हिडीओत काय आहे ते. तर या व्हिडीओमध्ये तीन तरुण आपल्या क्रिएटिव्हीटीचे उत्तम उदाहरण सादर करताना दिसत आहेत. त्यांची क्रिएटिव्हीटी पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हे तरुण प्लास्टिक (plastic), माती आणि टिनच्या साहाय्याने आलिशान कार बनवताना दिसत आहेत. ही कार हुबेहूब बुगाटी (Bugatti ) कारसारखी दिसते. तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे कार रस्त्यावर धावतेदेखील. यासंदर्भात झी न्यूज हिंदीनं वृत्त दिलंय.

संबंधित बातम्या

मातीपासून बनवलेली ही कार पाहिल्यानंतर तुम्हाला खरी आणि नकली यात फरक ओळखणे कठीण होईल. व्हिडीओत सर्व प्रथम तरुणांनी माती आणल्याचे दिसून येते. या मातीचा वापर ते कार बनवण्यासाठी करतात. तरूण मातीशिवाय प्लास्टिक आणि टिनचाही वापर करतात. यानंतर तो कुठूनतरी जुगाड करून गाडीचे इंजिन आणतात आणि मग त्यांची क्रिएटिव्हीटी वापरून तयार होते आलीशान कार. त्यानंतर ते आणलेलं इंजिन मातीच्या गाडीला जोडतात आणि कार वापरण्यास तयार होते. आजकाल लोक इतके क्रिएटिव्ह झाले आहेत की कधी काय बनवतील याचा नेम नाही. तीन तरुणांनी माती आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या आलीशान कारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या