नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : जगभरात असे अनेक व्हिडीओ (Viral Video On Social Media) असतात जे पाहून कोणीही हैराण होईल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वसाधारणपणे रस्त्यावर कोणाची दुचाकी बिघडली तर दुसरा दुचाकीस्वार समोरच्याला मदत करतो. यासाठी तो एक पाय समोरच्या बाईकच्या मागच्या बाजूला ठेवून पुढे जात राहतो. मात्र तुम्ही कधी कुणा तरुणाला एकत्रितपणे दोन बाईक चालवताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण विचित्र प्रकारे बाईक चालवताना दिसत आहे. तुम्हीदेखील हा व्हिडीओ पाहून हैराण व्हाल. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी हा दोन्ही बाईक चालवित होता, तेदेखील एखाद्या सराईताप्रमाणे…नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, आम्ही इतका भारी रायडर कधीच पाहिला नाही.
गर्दीच्या रस्त्यावर तरुणाला ही बाईक चालवताना पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. तो अगदी सहजपणे दोन्ही बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ memecentral.teb नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.