JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : स्टेजवरच नवरीच्या गालासोबत खेळू लागला तरुण, रागाच्या भरात नवरदेवाने....

Viral Video : स्टेजवरच नवरीच्या गालासोबत खेळू लागला तरुण, रागाच्या भरात नवरदेवाने....

लग्न समारंभातील अनेक धमाल मस्तींचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जानेवारी : सध्या लग्नसराई सुरु असून अनेकजण लग्नबंधनात अडकताना पहायला मिळत आहे. लग्नाविषयीचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. लग्न समारंभातील अनेक धमाल मस्तींचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. लग्न म्हटल्यावर अनेक धमाल मस्ती पहायला मिळते. कधी कधी ही मस्ती चांगलीच महागही पडते. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरुन पहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, लग्न समारंभ होत आहे आणि नवरा नवरी स्टेजवर बसले आहे. तेवढ्यात एक मुलगा नवरीशेजारी येतो आणि तिच्या गालाशी खेळू लागतो. मुलगी तोंड वागडं करते. हे पाहून नवऱ्या मुलाला राग येतो आणि तो त्या मुलाच्या कानशिलात लगावतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

Ashiq Billota Official या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी चांगलीच मजा घेत आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत आहेत.

दरम्यान, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्नातील व्हिडीओ तर खूप लवकर इंटरनेचवर धुमाकूळ घालताना पहायला मिळतात. व्हिडीओच्या मध्यभागी काही मीम्स टाकत असे व्हिडीओ व्हायरल होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या