JOIN US
मराठी बातम्या / Viral / मुलाला दूध पाजताच मरून जाते ही आई, मृत्यू दिसत असतानाही बाळाला ठेवत नाही उपाशी

मुलाला दूध पाजताच मरून जाते ही आई, मृत्यू दिसत असतानाही बाळाला ठेवत नाही उपाशी

अलीकडेच एका किड्यावर झालेल्या संशोधनात असं दिसून आलं, की किड्यांच्या (Worms) मादीने पिल्लांना जन्म दिला, की त्यांना दूध पाजल्यानंतर ती कमजोर होते आणि त्यामुळे तिचा मृत्यू होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 ऑक्टोबर : आईच्या मायेविषयी किती आणि काय काय सांगायचं? आपल्या मुलांच्या भल्यासाठी आई कोणत्याही पातळीला जाऊ शकते; मग तो माणूस असो किंवा प्राणी. कोणत्याही आईची माया पाहिली, की डोळे भरून येतात. अलीकडेच एका किड्यावर झालेल्या संशोधनात असं दिसून आलं, की काही किडेही याला अपवाद नसतात. या किड्यांच्या (Worms) मादीने पिल्लांना जन्म दिला, की त्यांना दूध पाजल्यानंतर ती कमजोर होते आणि त्यामुळे तिचा मृत्यू होतो. तसं होणं निश्चित असलं, तरीही ती पिल्लांना दूध पाजण्याचं आपलं कर्तव्य सोडत नाही. ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’मध्ये (University College London) झालेल्या संशोधनात असं दिसून आलं, की अशी प्रक्रिया निमॅटोड वर्म्समध्ये (Nematode Worms) आढळून येते. निमॅटोड्सना मराठीत सूत्रकृमी असं म्हणतात. निमॅटोड्समधल्या माद्या आपल्या पिल्लांसाठी दुधासारखा पदार्थ तयार करतात आणि नंतर मरून जातात. या संशोधनातून आता असा शोध लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, की माणसांचं वय वाढणं रोखण्यासाठी याचा काही उपयोग होईल का? या संशोधनाचे प्रमुख लेखक प्रा. डेव्हिड जेम्स (Pro. David James) यांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन यशस्वी झालं, तर माणसाचं वय वाढण्यापासून थांबवणं शक्य होऊ शकतं. संशोधनात असं आढळलं आहे, की हे किडे शरीरात विशिष्ट तऱ्हेचा द्रवपदार्थ (Liquid Fluid) तयार करतात. तो द्रव पिवळ्या रंगाचा असतो आणि तो मादीच्या शरीरात तयार होतो. हा द्रव आम्लधर्मी म्हणजेच अॅसिडिक असतो. त्यामुळे किड्यांच्या शरीराला तो जणू खाऊनच टाकतो. या द्रवामुळे मादी किड्याचं शरीर कुजतं आणि काही वेळातच तिचा मृत्यू होतो. हे किडे आपल्या वजनापेक्षाही अधिक वजनाची अंडी देतात. हे किडे आपल्या शरीरातले पोषक घटक (Nutrients) आपल्या पिल्लांच्या शरीरात हस्तांतरित करतात. या किड्यांना जिवंत राखण्यासाठी जी पोषक तत्त्वं आवश्यक असतात, ती तत्त्वं मादी किडे आपल्या पिल्लांच्या शरीरात पाठवते. त्यामुळे अंड्यातून बाहेर येईपर्यंत पिल्लांचं पोषण होतं आणि त्यांना शक्ती मिळते; मात्र त्या पिल्लांची आई मात्र मृत होते. या प्रक्रियेमागे नेमकं काय कारण असेल, याचा शोध संशोधक आता घेत आहेत. ही प्रक्रिया नेमकेपणाने समजली, तर मानवी शरीराचं वय घटवण्याची प्रक्रिया करणं शक्य होऊ शकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. साहजिकच, तसं शक्य झालं, तर माणसांचं वय वाढेल. म्हणूनच शास्त्रज्ञ हे संशोधन अधिक सखोल पद्धतीने करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या