JOIN US
मराठी बातम्या / Viral / छतावरून स्विमिंगपूलमध्ये महिलेनं मारली उडी, निशाणा चुकला आणि...VIDEO VIRAL

छतावरून स्विमिंगपूलमध्ये महिलेनं मारली उडी, निशाणा चुकला आणि...VIDEO VIRAL

स्विमिंगपूलमध्ये उडी मारणाऱ्या या महिलेसोबत काय घडलं पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जुलै: आयुष्यात थ्रिल करणं कुणाला आवडत नाही. थ्रिलिंगची मजा तर सगळ्यांनाच अनुभवायची असते. पण हे थ्रिल आपल्या जीवावर बेतलं तर? छतावरून स्विमिंगपूलमध्ये उडी मारण्याचं थ्रिल अनुभवण्यासाठी महिलेनं प्लॅन केला खरा मात्र महिलेनं केलेला प्लॅन तिच्याच जीवावर बेतला. छतावरून उडी मारण्यासाठी महिला तयार झाली. त्यानंतर तिने उडी मारली खरी पण निशाणा चुकला आणि दुर्घटना घडली. स्विमिंगपूलमध्ये पडण्याऐवजी महिला छतावरून खाली पडली. छतावर आदळून महिला खाली कोसळल्यानंतर अजूबाजूलाही खूप गोंधळ उडाला. हा संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा- गाईसोबत अतिप्रसंग करत होता 55 वर्षीय इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ ट्वीटरवर 90 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. @jaahmiiin यांनी 6 जुलैला हा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ टिकटॉकवरून दोन वेळा हटवण्यात आला असल्याचंही युझरनं म्हटलं आहे. या व्हिडीओला 78.2 हजार रिट्वीट करण्यात आले आहेत. तर 3 लाखहून अधिक लाईक्स मिळवले आहेत. घराच्या छतावर महिला आणि तरुण स्विमिंगपूलमध्ये उडी मारण्यासाठी जातात. तिथून दोघंही एकदम पोहण्यासाठी पाण्यात उडी मारतात. पण महिलेचा निशाणा चुकतो आणि गोलांटी उडी मारून महिला छताला आपटून खाली पाण्यात पडते. या दुर्घटनेमुळे उपस्थितांच्या काळजचा ठोका चुकतो मात्र थोड्यावेळानं सगळ्यांमध्ये हास्यकल्लोळ उठतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या