मुंबई, 14 जून : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) या परिस्थिती अनेक जण वर्क फ्रॉम होम (work from home) करत आहेत. कामाच्या गडबडीत जोडीदाराकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे अनेक घरात नवरा-बायकोमध्ये भांडणं होताना दिसत आहेत. तुमच्या पतीने किंवा पत्नीने तुमच्या दुर्लक्ष केलं तर तुम्ही काय कराल? साहजिकच भांडाल, रागवाल, रूसून बसाल. मात्र सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये पतीचं दुर्लक्ष झाल्यानंतर त्याचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी पत्नीने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. jmaybs टिकटॉक युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
@jmaybs Quarantine life got me like ##fyp ##funny ##twerk ##husband ##wife ♬ original sound - yay4cats
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. या जेव्हा पती काम करतो आणि तुम्ही काहीच करत नसता, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये ही महिला चक्क जोकर झाल्याचं पाहायला मिळते आहे. जोकर होऊन ती गाण्यावर डान्स करते आणि आपल्या पतीचं मनोरंजन करत, त्याचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा कोरोनापासूनही बचाव करणारा हसता-बोलता FACE MASK; एकदा व्हिडीओ पाहाच शरीराच्या ‘या’ भागांना वारंवार स्पर्श करणं पडेल महागात; बळावतील अनेक आजार