JOIN US
मराठी बातम्या / Viral / सरकारी नोकरी करणारी मुलगी हवी! हुंडा मी देणार, तरुणाचा हटके VIDEO पाहून म्हणाल....

सरकारी नोकरी करणारी मुलगी हवी! हुंडा मी देणार, तरुणाचा हटके VIDEO पाहून म्हणाल....

सोशल मीडियावर प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक काय काय युक्त्या करतील याचा काही नेम नाही. काहीतरी हटके, मजेशीर, विचित्र करत लोक ट्रेंडमध्ये येण्याचा प्रयत्न करतात.

जाहिरात

व्हायरल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जानेवारी : सोशल मीडियावर प्रसिद्धी झोतात येण्यासाठी लोक काय काय युक्त्या करतील याचा काही नेम नाही. काहीतरी हटके, मजेशीर, विचित्र करत लोक ट्रेंडमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ गराळा घालत असतात. व्हायरल व्हिडीओंमुळे लोक चर्चेत येत असतात. सध्या एक व्यक्ती पोस्टरमुळे चर्चेत आला आहे. व्हायरल होत असलेला व्यक्ती हातात पोस्टर घेऊन भर बाजारत उभा राहिलेला पहायला मिळत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी पाहुया. व्हायरल होत असलेला मुलगा बाजारात लग्नाच्या जाहिरातीचे पोस्टर हातात घेऊन उभा आहे. पोस्टरवर लिहिले आहे, ‘लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, मी हुंडा देईन’. हे लिहिलेलं पाहून उपस्थित लोक हसू लागले. हा मुलगा छिंदवाडा येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, मुलगा हातात मोठे पोस्टर घेऊन बाजाराच्या मध्यभागी उभा आहे. पोस्टरच्या माध्यमातून तो सरकारी नोकरी असलेल्या वधूच्या शोधात असल्याचं समजतंय. ज्यासाठी तो त्याच्या वतीने हुंडा द्यायलाही तयार आहे. त्याची स्टाइल आणि डिमांड पाहून लोक खूप हसले. पण तो गोंधळाला न जुमानता पोस्टर हातात घेऊन रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. कुणास ठाऊक, सरकारी नोकरी असलेली मुलगी कदाचित त्याच्याकडे बघून त्याची लग्नाची ऑफर स्वीकारेल या आशेने.

@SushantPeter302 या ट्विटर अकांउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र अनेकांना त्याचे पाऊल व उपक्रम कौतुकास्पद वाटले. समान दर्जा देण्याबाबत नेटकरी बोलत आहे. जर मुलीचे आई-वडील नोकरी करणाऱ्या मुलासाठी मोठा हुंडा देतात, तर मुलीची नोकरी सरकारमध्ये असताना तिलाही हुंडा का मिळू नये. किंवा निदान त्या मुलीने तरी हुंडा न देता लग्न करावे. ‘एका युजरने लिहिले, त्या माणसाने कायदा आणि समाजातील काळे आणि घाणेरडे धंदे सर्वांसमोर दुरुस्त केले आहेत, हे एक धाडसी कृत्य आहे, विचार बदला, देश बदलेल, अशा अनेक कमेंटचा भडिमार या व्हिडीओवर होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या