JOIN US
मराठी बातम्या / Viral / ‘बचपन का प्यार’नंतर आता ‘दिलबर दिलबर’, विद्यार्थ्याच्या VIDEO ला जोरदार पसंती

‘बचपन का प्यार’नंतर आता ‘दिलबर दिलबर’, विद्यार्थ्याच्या VIDEO ला जोरदार पसंती

एक शालेय विद्यार्थी ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ (VIvek Chaturvedi dance on dilbar song goes viral) सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायपूर, 28 नोव्हेंबर: एक शालेय विद्यार्थी ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ (VIvek Chaturvedi dance on dilbar song goes viral) सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वी शालेय विद्यार्थी गात असलेल्या बचपन का प्यार, या गाण्याचा व्हिडिओ चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता शालेय मुलगा सुश्मिता (Viral video of student) सेननं अभिनय केलेल्या ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावर थिरकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मैदानात करतो डान्स मैदानात दिलबर दिलबर हे गाणं स्पीकरवर वाजताना दिसतं. हे गाणं लागताच विवेक चतुर्वेदी नावाचा मुलगा त्यावर डान्स करू लागतो. अभिनेत्री सुश्मिता सेननं जशा स्टेप्स गाण्यात केल्या आहेत, हुबेहूब तशाच स्टेप्स हा विद्यार्थी करताना दिसतो. त्याची निरीक्षण शक्ती आणि नृत्यकौशल्य या दोन्ही बाबी अफाट असल्याचं या व्हिडिओतून दिसतं. विद्यार्थी नाचू लागल्यानंतर आजूबाजूला उभे असणारे सगळे टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देताना दिसतात. त्यामुळे विवेकचा उत्साह आणखी वाढतो आणि तो उत्साहाने या गाण्यावर डान्स करतो.

संबंधित बातम्या

व्हिडिओ होतोय व्हायरल लहान मुलांचे असे अजब व्हिडिओज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या मुलाचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ युजर्सचं लक्ष वेधून घेणारा असून तो आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे. युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तो शेअर करण्यात येत आहे. हे वाचा - महाविकास आघाडी सरकार पडण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांना भुजबळांचं प्रत्युत्तर इंटरनेटमुळे व्हिडिओंना उधाण सध्या इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत असून त्यांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. प्रत्येकाला इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म मिळाला असल्यामुळे आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. अर्थात यापैकी बहुतांश व्हिडिओ हे अल्पजीवी असले, तरी काही व्हिडिओ मात्र जोरदार व्हायरल होतात आणि बराच काळ चर्चेत राहतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या