JOIN US
मराठी बातम्या / Viral / रडणाऱ्या घोड्याचा VIDEO Viral, डोळ्यातले अश्रू बघून नेटिझन्स इमोशनल!

रडणाऱ्या घोड्याचा VIDEO Viral, डोळ्यातले अश्रू बघून नेटिझन्स इमोशनल!

माणसांप्रमाणे प्राण्यांनाही (Animal) भावना असतात. प्रत्येक प्राणी भावना, दुःख, आनंद वेगवेगळ्या पध्दतीनं व्यक्त करतो. सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे विविध व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या एका घोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओनं नेटिझन्सला अक्षरशः हादरवून सोडलं आहे. या व्हिडीओमध्ये एक घोडा (Horse) रडताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी : माणसांप्रमाणे प्राण्यांनाही (Animal) भावना असतात. प्रत्येक प्राणी भावना, दुःख, आनंद वेगवेगळ्या पध्दतीनं व्यक्त करतो. सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे विविध व्हिडीओ शेअर केले जातात. अशा व्हिडीओला नेटिझन्सकडून पसंती देखील मिळते. सध्या एका घोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओनं नेटिझन्सला अक्षरशः हादरवून सोडलं आहे. या व्हिडीओमध्ये एक घोडा (Horse) रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सदेखील इमोशनल झाले आहेत. तसेच घोडा का रडतोय, त्याला नेमकं काय झालं आहे, असे प्रश्न देखील विचारले जात आहेत. प्राण्यांनाही समस्या असतात, त्यांनाही त्रास होतो, ही बाब अनेकदा माणसांच्या लक्षात येत नाही. प्राणी आपला त्रास, वेदना तोंडानं सांगू शकत नाही. परंतु, त्यांचे डोळे मात्र सारंकाही सांगून जातात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे ही बाब अधोरेखित होते. या व्हिडीओमध्ये एक घोडा रडताना दिसत आहे. घोडयाला रडताना पाहून नेटिझन्सही भावूक झाले असून त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram) hepgul5 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 1 जानेवारीला अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 81 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओतील घोडा रुग्णालयात असून, त्याच्यावर उपचार सुरू असावेत, असं वाटतं. हा घोडा सतत रडत (Crying) आहे. केवळ व्हिडीओ पाहून घोड्याच्या वेदनांचा अंदाज येणं शक्य नाही. परंतु, संपूर्ण व्हिडीओत हा घोडा सतत रडताना दिसतो.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्सचे देखील डोळे पाणावले. काही नेटिझन्स (Netizens) कमालीचे भावूक झाले. काही युजर्सला तर अश्रू रोखता आले नाहीत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक युजर कमेंट करताना लिहितो की ``या घोड्याच्या वेदना पाहवत नाहीत, कृपया त्याला तातडीनं मुक्त करा``. दुसऱ्या एका युजरनं घोड्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तो लिहितो की ``या घोड्याला नेमकं काय झालं आहे. त्याला एवढ्या वेदना का होत आहेत``? याच पद्धतीने अनेक युजर्सनं अॅडमिनला घोड्याच्या रडण्यामागं नेमकं काय कारण आहे, असा प्रश्न विचारला आहे. बहुतांश युजर्स घोड्याच्या स्थिती बघता चिंता व्यक्त करत आहेत आणि निरनिराळे प्रश्न उपस्थित करत आहेत. एकूणच काही सेकंदाच्या या व्हिडीओमुळं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या